बेंगळुरु। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (9डिसेंबर) बेंगळुरु एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली.
श्री कांतीरवा स्टेडियमवर उदांताने आपल्या आधीच्या संघाविरुद्ध गोल करीत सध्याच्या संघाचे खाते उघडले. चेंचो गील्टशेन याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने राहूल भेके याला पास दिला. राहुलने डावीकडून मुसंडी मारली. त्याने चेंडूवरील कौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने बॉक्समध्ये हवेत क्रॉस चेंडू मारला. त्यावर उदांताने उडी घेत हेडिंगवर लक्ष्य साधले.
मुंबई सिटीने 31व्या मिनिटाला बरोबरी साधली. सौविक चक्रवर्ती याने अरनॉल्ड इसोकोला पास दिला. उजवीकडून रचलेल्या या चालीवर अरनॉल्डने पुढे चांगला प्रतिसाद दिला. त्याने मोडोऊ सौगौऊ याला पास दिला. त्यावर सौगौऊ याने हेडिंग केले आणि चेंडू नेटमध्ये घालविला.
या निकालामुळे बेंगळुरूची अपराजित मालिका कायम राहिली. त्यांचे 10 सामन्यांत सात विजय व तीन बरोबरीसह 24 गुण झाले. मुंबई सिटीने 11 सामन्यांत सहा विजय, तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह 21 गुण मिळविले आहेत. त्यांनी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळविला. नॉर्थइस्टचे 11 सामन्यांतून 20 गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय
–एमएस धोनीच्या कूल विक्रमाला यष्टीरक्षक रिषभ पंतचा धक्का