मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीच्या सलामीच्या लढतीत घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आयबेरिया द्वीपकल्पातील आहेत. त्यामुळे मुंबई फुटबॉल एरिनावरील या सामन्याला त्यांच्या कार्यपद्धतीमधील लढतीचीही किनार असेल.
मुंबई सिटीवरील पोर्तुगीज प्रभाव लक्षणीय आहे. ते पोर्तुगालचे आहेत. त्यांचे प्रमुख खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा पोर्तुगालमधील क्लबकडून खेळले आहेत. यात रफाएल बॅस्तोस, अरनॉल्ड इसोको, मौडौ सौगौ आणि पाउलो मॅचादो यांचा समावेश आहे.
आपल्या कार्यपद्धतीची कल्पना असल्यामुळे कोस्टा भक्कम या खेळाडूंवर अवलंबून असतील. जमशेदपूरच्या संघावर स्पेनचा प्रभाव आहे. त्यांच्याविरुद्ध कोस्टा यांना बचावात्मक संघाची बांधणी करावी लागेल.
कोस्टा म्हणाले की, मला पोर्तुगीज शैली आवडते. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही पाहिलेच पाहिजे. माझी स्वतःची खेळण्याची शैली आहे. माझ्याकडे माझे खेळाडू आहेत, ज्यांच्याविषयी मला फार आदर वाटतो. त्यांच्याकडून कमाल कामगिरी होईल अशा पद्धतीचा खेळ मी करून घेईन.
ते पुढे मिस्कीलपणे म्हणाले की, चेंडूवर ताबा ठेवण्याकडे आमचे लक्ष असेल आणि स्पेनच्या प्रशिक्षकांना सुद्धा हेच हवे असते याची मला कल्पना आहे. त्यामुळे ही आमच्यासमोरील एक मोठीच समस्या आहे.
मुंबईच्या गोलरक्षणाची मदार अमरिंदर सिंग याच्याकडे असेल. ल्युचीयन गोएनकडे बचावाची सूत्रे असतील. पूर्वी जमशेदपूरकडून खेळलेले सौविक चक्रवर्ती आणि शुभाशिष बोस हे दोघे फूल-बॅक असतील. मध्य फळीत मॅचादो आणि सेहनाज सिंग असतील. गोल नोंदविण्याची जबाबदारी बॅस्तोसवर राहील.
गेल्या मोसमात जमशेदपूरने स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बचाव प्रदर्शित केला होता. नव्या मोसमासाठी मात्र ऍटलेटीको माद्रिदचे माजी मार्गदर्शक सेझार फरांडो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते स्पॅनिश शैलीला साजेसा खेळ करण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी चेंडूवर ताबा ठेवण्याचे धोरण असेल. ऑस्ट्रेलियाचा टीम कॅहील आणि ब्राझीलचा मेमो यांच्या जोडीला त्यांच्याकडे पाच स्पॅनिश खेळाडू आहेत. त्यामुळे आपल्या आवडीचा खेळ करू शकेल असा संघ बनविण्याची मोकळीक त्यांना मिळाली आहे.
फरांडो म्हणाले की, मी स्पेनचा आहे आणि स्पेनमध्ये आमचे स्वतःचे असे फुटबॉल तत्त्वज्ञान असते. उदाहरण द्यायचे झाल्यास आम्ही छोट्या पासेसवर लक्ष केंद्रित करतो, चेंडूवर ताबा ठेवतो, पण सामने जिंकणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. ते करू शकू अशी मला आशा आहे.
मारिओ आर्क्वेस आणि सर्जिओ सिदोंचा अशा खेळाडूंना चेंडूवरील ताब्यासाठी, चाली रचण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी प्राधान्य मिळण्याची अपेक्षा ाहे. बचावाची मदार टिरीकडे असेल, तर राष्ट्रीय संघाकडून सॅफ स्पर्धेत खेळलेल्या सुमीत पासीकडे नऊ नंबरच्या खेळाडूची भूमिका असेल.
स्टार खेळाडू कॅहील आणि पहिला पसंतीचा गोलरक्षक सुब्रत पॉल यांना निलंबनामुळे खेळता येणार नाही. हा संघासाठी धक्का असेल. जमशेदपूर चेंडूवरील ताब्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे मुंबई सिटीने दडपणाचा सामना करीत प्रतिआक्रमण रचले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे नसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–…म्हणून करुण नायर म्हणतो; तरी झाली कुठं चूक, माझी मला कळंना!!!
–टीम इंडियात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या युवराजचे शतक हुकले
–या एका निर्णयामुळे बीसीसीआय येणार गोत्यात