fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानचे कोलकाता डर्बीत वर्चस्व

November 27, 2020
in टॉप बातम्या, फुटबॉल
0

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एटीके मोहन बागानने कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगालचा 2-0 असा पराभव केला. याबरोबरच एटीकेएमबीने भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या कोलकाता डर्बीत निर्विवाद वर्चस्व राखले.

फिजीचा 33 वर्षीय स्ट्रायकर रॉय कृष्णाने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी गोल केला. त्यानंतर पाच मिनिटे बाकी असताना भारताच्या मानवीर सिंग याने बदली खेळाडू म्हणून लक्ष्य साधले.

एटीकेएमबीने याबरोबरच गुणतक्त्यात आघाडी घेतली. त्याचा हा सलग दुसरा विजय असून त्यांचे सहा गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (2 सामन्यांतून 4) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बहुचर्चित लढतीत स्पेनच्या अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीकेएमबीने लिव्हरपूलचे दिग्गज रॉबी फाऊलर यांच्या एससी ईस्ट बंगलला सहज शह दिला. वास्को येथील टिळक मैदानावर ही लढत झाली.

मध्यंतराच्या गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धाच्या प्रारंभी खाते उघडण्याची शर्यत एटीकेएमबीने जिंकली. मध्य फळीतील जयेश राणेने डावीकडून मुसंडी मारत ही चाल रचली. त्याने मध्य फळीतील सहकारी जेव्हीयर हर्नांडेझ याला पास दिला. त्यातून कृष्णाला उजवीकडे गोलक्षेत्रालगत चेंडू मिळाला. व्यवस्थित नियंत्रण मिळवित त्याने डाव्या पायाने ताकदवान फटका मारला. ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार डावीकडेच झेप टाकूनही गोल अडवू शकला नाही. कृष्णाने गेल्या मोसमात 21 सामन्यांत 15 गोल केले होते. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत त्याने संयुक्त अव्वल स्थान मिळविले होते.

हबास यांनी 63व्या मिनिटाला आघाडी फळीतील डेव्हिड विल्यम्स याच्याऐवजी मानवीरला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविले होते.  केरला ब्लास्टर्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात मानवीरने बदली खेळाडू म्हणूनच प्रभाव पाडला होता. त्याच्या चालीवर कृष्णाने गोल केला होता. यावेळी मानवीरने गोलचा पराक्रम नोंदवित आपली उपयुक्तता सिद्ध केली.

एटीकेएमबीच्या रॉय कृष्णाने दुसऱ्याच मिनिटाला डावीकडून आगेकूच केली, पण त्याला रोखण्यात आले. सहाव्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या मध्य फळीतील सुरचंद्र सिंगने डावीकडे चेंडूवर नियंत्रण मिळवित मध्यरक्षक जॅक्स मॅघोमाला पास दिला, पण या चालीचे फिनिशिंग होऊ शकले नाही.

20व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा मध्यरक्षक अँथनी पिल्कींग्टनने नेटच्या दिशेने फटका मारला, पण त्याला पुरेशी ताकद लावता आली नाही. त्यामुळे एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य चेंडू सहज अडवू शकला.

34व्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर ईस्ट बंगालला मिळाला. नारायण दासने घेतलेला कॉर्नर एटीकेएमबीच्या बचाव फळीने फोल ठरविला. दोन मिनिटांनी एटीकेएमबीला थ्रो-ईनची संधी मिळाली. त्यावर जेव्हीयर फर्नांडेझने मारलेला फटका ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदारने अचूक अंदाज घेत अडवला.

दुसऱ्या सत्रात 63व्या मिनिटाला ईस्ट बंगालला संधी मिळाली होती. पिल्कींग्टनला उजवीकडे चेंडू मिळाला. त्याच्या पासवर मॅघोमा मात्र अकारण ताकद लावल्यामुळे फिनिशींग करू शकला नाही. त्याआधी स्ट्रायकर बलवंत सिंगला फिनिशींग करता आले नव्हते.

68व्या मिनिटाला एटीकेएमबीच्या मध्य फळीतील कार्ल मॅकह्यूज याने संधी दवडली. 72व्या मिनिटाला एटीकेएमबीकडून फ्री किक वाया गेली. हर्नांडेझने घेतलेल्या फ्री किकवर मॅकह्यूजने हेडिंग केले, पण चेंडू नेटजवळून बाहेर गेला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयएसएल २०२०: कोलकाता डर्बीमध्ये रंगणार सामना; फाऊलर, हबास यांची अनुभवावर मदार

आयएसएल २०२०: नॉर्थईस्टची दोन गोलांच्या पिछाडीवरून ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात


Previous Post

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

Next Post

…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

...म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी

Photo Courtesy: www.iplt20.com

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

Photo Courtesy: Twitter/ ICC

'असा' कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.