---Advertisement---

एफसी गोवा संघासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान, दोघांना चूक महागात पडणार

FC Goa vs NorthEast United FC
---Advertisement---

एफसी गोवा इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल ) च्या प्ले ऑफच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांना पाचव्या क्रमांकावर असलेल्या ओडिशा एफसीला मागे टाकण्याची संधी आहे. रविवारी (15 जानेवारी) त्यांना गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचा सामना करायचा आहे. सातव्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईयन एफसी आणि गोवा यांच्यात 3 गुणांचा फरक आहे. त्यामुळे गोवा ही आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. 

मागील लढतीत एफसी गोवाला गतविजेत्या हैदराबाद एफसीकडून हार मानावी लागली होती. नॉर्थ ईस्ट युनायटेड यंदाच्या पर्वातील दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात आहेत. बंगळुरू एफसीविरुद्ध मागील सामन्यात त्यांना तगडी लढत देऊनही पराभव पत्करावा लागला होता.

रोमेन फिलिपोटूने मागील सामन्यात गोल केला होता. यंदाच्या पर्वातील हा त्याचा दुसरा गोल ठरला. विलमार जॉर्डनला सलग दुसऱ्या सामन्यात गोल करता आला नाही. मुख्य प्रशिक्षक व्हिन्सेंझो ऍनेसे हे उद्याच्या सामन्यात काही प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. गोलरक्षक मिर्शाद मिचूने यंदाच्या पर्वात 45 गोल वाचवले आहेत. अन्य कोणत्याही गोलरक्षकाला त्याच्या आसपास पोहोचला आलेले नाही.

“एफसी गोवाविरुद्धचा सामना सोपा नक्की नसेल. यंदाच्या पर्वात त्यांचा खेळ उल्लेखनीय झाला आहे. एडू बेडिया हा अनुभवी खेळाडू आहे आणि हा त्यांच्या यशाचा महत्त्वाचा धागा आहे. नोहा सदौही हा आणखी एक चांगला खेळाडू त्यांच्याकडे आहे. त्याने अनेकदा प्रतिस्पर्धीची डोकेदुखी वाढवली आहे. आशा करतो की उद्या आम्ही चांगला खेळ करू,” असे ऍनेसे म्हणाले.

एफसी गोवाला मागील सामन्यात हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला आहे. अखेरच्या दहा मिनिटांत बार्थोलोमेव ऑगबेचेने गोल करुन हॅटट्रिक पूर्ण केली होती. मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी मागील सामन्यात सर्वात तगडा संघ मैदानावर उतरवला होता, परंतु ऑगबेचेला ते रोखू शकले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पेना संघात काही बदल करू शकतील. अलव्हारो व्हॅजगेज हा त्यांच्या कडे पर्याय आहे. नोआलाही ते बाकावर बसवू शकतील. त्याने 13 सामन्यांत 10 गोलसाठी योगदान दिले आहे. इकर गौरारक्सेनानेही 5 गोल केले आहेत.

“उर्वरित पाच लढती या आमच्यासाठी फायनलप्रमाणे आहेत. आम्हाला अव्वल सहामध्ये राहायचे आहे आणि प्रत्येक सामना जिंकायचा आहे. आम्ही 3 गुण मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार. नवीन प्रशिक्षक आल्यानंतर नॉर्थ ईस्टचा खेळ उंचावला आहे. त्यांनी एटीकेला हरवले आहे आणि त्यामुळे उद्या आमची कसोटी लागेल,” असे पेना म्हणाले.

उभय संघामध्ये 17 सामने झाले आहेत आणि गोवाने 6, तर नॉर्थ ईस्टने 3 विजय मिळवले आहेत. 8 लढती ड्रॉ राहिल्या. (ISL 2022-23 FC Goa take on NorthEast United FC with no scope for error)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई सिटी एफसीची अव्वल स्थानावर मजबूत पकड; मोहन बागानचा घरच्या मैदानावर पराभव
INDvSL: क्लीन स्वीप करण्यासाठी भारताच्या फलंदाजीत बदल अशक्य! पाहा दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---