गोवा : फॉर्मात असलेला हैदराबाद एफसीसमोर हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामात अव्वल स्थान राखण्यासाठी चौथ्या क्रमांकावर असलेल्या केरला ब्लास्टर्स एफसीचे आव्हान आहे. उभय संघांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने बुधवारी (२२ फेब्रुवारी) चुरशीची लढत अपेक्षित आहे.
हैदराबाद एफसीने १७ सामन्यांतून ३२ गुणांसह उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे. आणखी तीन सामने शिल्लक असल्याने प्ले-ऑफमध्ये खेळण्याची सर्वाधिक संधी आहे. मात्र, सध्या गुणतालिकेतील पहिल्या चार संघांमध्ये एक-दोन गुणांचा फरक असल्याने प्रत्येक संघ स्वत:चे स्थान अधिक मजबूत करण्यास उत्सुक आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील जमशेदपूर एफसी, एटीके मोहन बागान आणि केरला ब्लास्टर्स एसीने प्रत्येकी १६ सामन्यांत अनुक्रमे ३१, ३० आणि २७ गुण मिळवले आहेत.
केरला ब्लास्टर्सच्या खात्यात १६ सामन्यांतून २७ गुण आहेत. पाचव्या आणि सहाव्या स्थानी असलेल्या बंगलोर एफसी (२६ गुण) आणि गतविजेता मुंबई सिटी एफसीलाही (२६ गुण) प्ले-ऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. आणखी एका गुणासह केरलाचे टॉप फोरमधील स्थान आणखी मजबूत होईल. त्यामुळे हैदराबादसह त्यांनाही विजय तितकाच महत्त्वाचा आहे.
आयएसएलच्या आठव्या हंगामातील सांघिक कामगिरीबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र, अजूनही सुधारणा आवश्यकता आहे. बुधवारचा प्रतिस्पर्धीही तुल्यबळ आहे. केरलानेही सातत्य राखले आहे. त्यांचा बचाव सर्वोत्तम आहे, असे हैदराबाद एफसीचे मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांनी सांगितले.
बुधवारच्या लढतीत केरला ब्लास्टर्सला ऑग्बेचे याला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. हैदराबादच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमध्ये त्याचे मोठे योगदान राहिले आहे. एकूण नववा आयएसएल हंगाम खेळणाऱ्या नायजेरियनच्या या खेळाडूने या लीगमधील गोलांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आयएसएलमध्ये ५०हून अधिक गोल करणारा तो केवळ दुसरा फुटबॉलपटू आहे. यंदाच्या हंगामात एकूण १६ गोल करताना ऑग्बेचे याने आयएसएलमधील वैयक्तिक गोलांचा विक्रम मागे टाकला आहे.
आठव्या हंगामातील पहिल्या लढतीत केरला ब्लास्टर्सनी हैदराबाद एफसीला १-० असे रोखले होते. त्यात सात