---Advertisement---

‘या’ खेळाडूने शूटींग खेळाच्या विश्वचषकात फडकावला तिंरगा, सुवर्णपदक जिंकताच केला मोठा विक्रम

On: मंगळवार, जुलै 19, 2022 2:00 PM
Mairaj Khan
---Advertisement---

कोरियाच्या चांगवन येथील आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेत भारताचे महान शूटर मैराज खान यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी या स्पर्धेतील स्कीट नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. देशाचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे.

दोन वेळेचे ऑलिम्पिक विजेते ४६ वर्षीय मैराज खान (Mairaj Khan) यांनी पात्रता स्पर्धेत ११९/१२५ अशी शूटींग करत सहज विजय मिळवला होता. खान हे भारताचे या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. त्यांनी रिओ दी जानिरो य़ेथे झालेल्या २०१६च्या विश्वचषकात रौप्यपदक जिंकले होते.

मैराज यांच्याकडे अनुभवाची कमतरता नसून त्याचा या स्पर्धेत त्यांना खूप फायदा झाला आहे. या स्पर्धेत त्यांनी अंतिम पात्रता फेरीत दोन शूटर्ससोबत लढत दिली. त्यातील एक कुवेतचा दोन वेळेचा ऑलम्पिक विजेता अब्दुल्ला अल रशीदी हा होता. खान यांनी पाच जणांच्या या शूटऑफमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

 

अंजुम मौदगिल, आशी चोक्सी आणि सिफ्ट कौर समरा यांनी महिलांच्या ५०मी रायफल तीन जणींच्या समूहामध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

भारत या स्पर्धेत आतापर्यंत ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य जिंकत पदकतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता, बेन स्टोक्सला झाली होती अटक! नक्की काय आहे प्रकरण

स्टोक्सने स्वत:च्याच पायावर मारलेली कुऱ्हाड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झालेला विचित्र पद्धतीने बाद

भारतीय दिग्गज विराटला पुन्हा बनवणार ‘किंग’, म्हणाले – ‘फक्त २० मिनिटात…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---