शुक्रवारी (24 मार्च) इझी वोंग हिने डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील पहिली विकेट्सची हॅट्रिक घेतली आणि मुंबई इंडियन्सला अंतिम सामन्यात पोहोचवले. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स या एलिमिनेटर सामन्यात आमने सामने होते. दरम्यान वाँगने या सामन्यात घेतलेल्या सलग तीन विकेट्सनंतर अनेकांना सीएसके आणि भारताचा माजी दिग्गज गोलंदाज लक्ष्मिपथी बालाजी याची आठवण आली.
बीसीसीआयने मागच्या काही वर्षांपासून होत असलेली मागणी लक्षात गेत यावर्षी महिला प्रीमियर लीगची सुरुवात केली. डब्ल्यूपीएलच्या हा पहिला हंगामात अतिशय रोमांचक ठरला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. एलिमिनेटर सामन्यात शुक्रवारी मुंबईने यूपी वॉरिअर्सला 72 धावांनी पराभूत केले. मुंबईची वरच्या फलीतील नेट सायव्हर ब्रंट (Nat Sciver-Brunt) हिने नाबाद 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यासाठी ब्रंडला सामनावीर पुरस्कार सोपवण्यात आला. इझी वोंग (Issy Wong) हिचे प्रदर्शन देखील अप्रतिम ठरले. तिने चार षटकात 15 धावा खर्च करून 4 विकेट्स नावावर केल्या. यादरम्यान आपली विकेट्सची हॅट्रिक देखील पूर्ण केले.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1639308824720056324?s=20
डब्लूयपीएलच्या पहिल्या हंगामात पहिली हॅट्रिक घेण्याचा मान पटकावल्यानंतर अनेकजन भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मिपती बालाजी () याच्यासोबत वाँगची तुलना करू लागले आहेत. जगातील सर्वात लोकप्रीय लीग म्हणून ओळखली जाणाऱ्या आयपीएलमध्ये बालाजीने सर्वात पहिल्यांदा विकेट्सची हॅट्रिक घेतली होती. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती. इरफान पठाण (IK Pathan), पीयुष चावला (PP Chawla) आणि विक्रम सिंग (VRV Singh) यांना लागोपाठ चेंडूंवर लक्ष्मिकांत बालाजीने तंबूत धाडले होते. असे असले तरी बालाजी या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देऊ शकला नाही. सीएसकेने 18 धावांनी पराभव स्वीकारला होता.
https://twitter.com/wplt20/status/1639310119774355462?s=20
तर दुसरीकडे इझी वाँगने शुक्रवारी वाँगने यूपीच्या डावातील तिसऱ्या षटकात कर्णधार एलिसा हिलीची विकेट घेतली. त्यानंतर डावातील 13 व्या षटकात मात्र तिने सलग तीन विकेट्स घेतल्या. किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लस्टन या तिघांनी तिने 13व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला.
(Issy Wong takes first hat trick in WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL2023 । पराभवाचा वचपा काढत मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; इलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सची धुळधाण
VIDEO । एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीतवर नामुष्की, यूपीच्या सोफीने केले क्लीन बोल्ड