मागच्या वर्षी कार अपघातात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पंत अपेक्षेपेक्षाही चांगल्या पद्धतीने दुखापतीतून सावरत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, त्याला मैदानात पुनरागमन करण्यासाठी मोठा काळ लागणार आहे. अशात आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकातून त्याचा पत्ता कट होताना दिसत आहे.
यावर्षी भारतीय संघाला आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवायचे आहे. तत्पूर्वी आशिया चषक देखील खेळवला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात खेळवला जाणारा आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबर आणि नव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक भारतीय खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. मात्र रिषभ पंत (Rishabh Pant) या दोन्ही प्रमुख स्पर्धांपर्यंत फिट होण्याची शक्यात जराही नाहीये. माहितीनुसार पंतला मैदानात पुनरागमन करण्यासाठी जानेवारी 2024 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. अशाय या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाला पंतची कमतरता जाणवणार, असेच दिसते.
आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला चालू आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागली. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. मैदानात उतरून खेळता येत नसले, तरी पंतने आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी नक्कीच लावली होती. पंतच्या जवलच्या व्यक्तिंकडून अशी माहितीही मिळाली होती की, त्याला कठुल्याही आधारची गरज नसताना चालण्यासाठी अजून काही आठवडे लागू शकतात.
पंतला क्रिकेट खेळण्यासाठी अजून किमान सात ते आठ महिने वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने मैदानात पुनरागमन केल्यानंतरही यष्टीरक्षक म्हणून खेळण्यासाठी अधिक वेळ लागेल. सुरुवातीच्या काळात त्याला फक्त फलंदाजांच्या भूमिकेत खेळता येणार आहे. पंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खेळत नसल्यास केएस भरत, केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या खेळाडूंना संधी मिळू शकते. दरम्यान, पंत लवकरात लवकर फिट होण्याच्या प्रयत्नात आहे आणि भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडूनही त्याला अपेक्षित प्रत्येक मदत मिळत आहे. (It is being said that the injured Rishabh Pant will not be able to play in the ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारला का खेळवले होते? WTC फायनलसाठी संधी न मिळाल्याने होतेय चर्चा
आला रे! मुंबईला बुमराहचा भक्कम सपोर्ट, गुजरातविरुद्धच्या सामन्याला लावली हजेरी