---Advertisement---

भारताला महत्वाची विकेट मिळवून देण्यासाठी विराटने केली काळी जादू! पाहा व्हिडिओ

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 6:49 PM
Virat Kohli Shubman Gill (1)
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. अभय संघांतील कसोटी मालिकेचा पहिला सामना सेंच्युरियनमध्ये सुरू आहे. बॉक्सिंग डे कसोटी म्हणजेच मंगळवारी (26 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली असून ऑस्ट्रेलिनच्या पहिल्या डावात विराट कोहली याने काळी जादू केल्याचे बोलले जात आहे.

बॉक्सिंग डे कसोटीची (Boxing Day Test) सुरुवात भारतीय संघाला अपेक्षित पद्धतीने करता आली नाही. पण प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (KL Rahul) याच्या शतकी खेळीमुळे भारत कसाबसा 245 धावांपर्यंत पोहोचला. प्रत्युत्तरात मोहम्मद सिराजने डावातील चौथ्याच षटकात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. दुसऱ्या विकेटसाठी मात्र संघाला बराच वेळ वाट पाहावी लागली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 29व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. बुमराहने आपल्या षटकातील शेवटचा चेंडू बाहेरच्या दिशेने वळवला आणि टोनी डी झोर्झी यात अडकला.

बुमराहने टाकलेला शटकातील हा शेवटचा चेंडू झोर्झीच्या बॅठला स्पर्श करून थेट यशस्वी जयस्वालच्या हातात गेला. जयस्वाल त्यावेळी तिसऱ्या स्लिप्सवर उभा होता. बुमराहने आपल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे संघाला ही महत्वाची विकेट मिळवून दिली. पण या विकेटनंतर विराट कोहली (Virat Kohli) देखील चर्चेत आला. भारताला ही विकेट मिलण्याच्या दोन चेंडू आधीच विराटने नॉन स्ट्राईक एंडवर स्टप्सच्या बेल्स आदला बदली केल्या होत्या. पुढच्या दोन चेंडूत भारताला झोर्झीच्या रुपात महत्वाची विकेट्स मिळाली. सोशल मीडियावर याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

(It is being said that Virat performed black magic so that India could get the ticket)

पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला राहुलच्या खेळीचा चाहता; म्हणाला, ‘असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही…’
ICC Rankings: टी20त इंग्लंडच्या पठ्ठ्याकडून सूर्याच्या जागेला धोका; वनडेत बाबरचा दबदबा, तर कसोटीत…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---