---Advertisement---

उर्वरित आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ‘हे’ 3 रेकाॅर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्य

---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवीन रेकाॅर्ड बनतात, तर अनेक जुने रेकाॅर्ड तुटतात. तत्पूर्वी विराट कोहली (Virat Kohli) हा आधुनिक क्रिकेटमधील अशा खेळाडूंपैकी एक आहे, जो सातत्याने नवनवीन रेकाॅर्ड्स रचत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने सर्वाधिक 50 शतकांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा जगातला एकमेव खेळाडू आहे. पण काही रेकाॅर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्या वाटत आहे.

1) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधित धावा- विराट कोहलीने (Virat Kohli) 2008 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं. गेल्या 16 वर्षात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण 533 सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13,906 धावा, कसोटी सामन्यात 8,484 धावा आणि टी20 सामन्यात 4,188 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 26,942 धावा आहेत.

पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वल क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या कारकीर्दीत 34,357 धावा केल्या होत्या. सध्या कोहली 35 वर्षांचा आहे. नवी टीम इंडिया तयार करण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत, त्यावरून तो जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल, हे अशक्य आहे.

2) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके- कोहलीने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो क्रिकेटच्या महान फलंदाजांपैकी एक आहे, परंतु त्याचा कसोटी रेकॉर्ड खास नाही. आतापर्यंत त्याने 113 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 8,848 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 29 शतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके तेंडुलकरच्या नावावर आहेत. कोहलीने गेल्या 4 वर्षात केवळ 2 कसोटी शतके झळकावली आहेत. तेंडुलकरला मागे सोडण्यासाठी त्याला अजून 23 शतके झळकावायची आहेत.

3) सर्वाधिक षटकार- कोहलीची खेळण्याची शैली पॉवर हिटिंगवर जास्त अवलंबून नसून तो टायमिंगसोबत खेळण्यावर विश्वास ठेवतो. रोहित शर्माच्या नैसर्गिक फलंदाजीच्या शैलीमध्ये पॉवर हिटिंगचा समावेश असल्याने, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 620 षटकार मारण्याचा रेकाॅर्ड आपल्या नावावर करू शकला आहे. कोहलीच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 301 षटकार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक; स्टार बॅडमिंनपटूची कमाल! लवकरच मेडलची बेरीज दुहेरी अंकात?
BAN vs PAK: पाकिस्तानचा दुसऱ्यांदा धु्व्वा उडवण्यासाठी बांगलादेशला 143 धावांची गरज
सूर्याची पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी हुकणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---