वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ मागच्या सलग चार सामन्यांमध्ये पराभूत झाला. याच पार्श्वभूमीवर कर्णधार बाबर आझम आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर टिका होत आहे. पाकिस्तान संघ शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका विकेटने पराभूत झाला. त्याआधी अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही बाबरच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाला मिळालेला पराभव निराशाजनक होता. अशात क्रिकेट बोर्डाने बाबर आझम () याच्या नेतृत्तवावर प्रश्न उफस्थित केल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर बाबर अधिकच निशाण्यावर आला आहे. असे असले तरी, मिकी आर्थर यांच्या मते संघातील सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे. आर्थर म्हणाले, “ते (पीसीबी) प्रत्येकाला दोषी ठरवतील. पण चिंता करण्याची गरज नाही. ही तर जगाची रित आहे. बाबर आझम, प्रमुख निवडकर्ते इंडमाम-उल-हक, आमचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर निशाण्यावर धरणे नक्कीच योग्य नाही.”
“मला माहीत आहे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी जबरदस्त प्रयत्न केले आहेत. खेळाडूंचे प्रयत्न खूप चांगले राहिले आहेत. जर त्यांनी (पीसीबी) खेळाडूंचे प्रयत्न पाहिले तर हैराण होतील,” असेही आर्थर पुढे म्हणाले.
दरम्यान, विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानने आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले आहेत. त्यातील पहिला सामना नेदर्लंड्सविरुद्ध आणि दुसरा सामना श्रीलंका संघाविरुद्ध पाकिस्तान संघाने जिंकला. मात्र, मागच्या चार सामन्यांमध्ये पाकिस्तानला अनुक्रमे भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. (It is inappropriate to treat Babar like this! Mickey Arthur tells the dark truth of PCB)
महत्वाच्या बातम्या –
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू
नॉर्मल वाटलो का! ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स गमावत केला वनडेतील दुसरा सर्वोच्च स्कोर, पाहा यादी