भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वनडे विश्वचषक 2023 साठी दुखापतग्रस्त ट्रेविस हेडचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाने स्पर्धेतील त्याच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळी खेळली. हेडने 67 चेंडूत 109 धावा केल्या आणि कारकिर्दीतील चौथे एकदिवसीय शतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवले.
दुखापतीमुळे ट्रेविस हेड (Travis Head) याला ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच सामन्यात खेळता आले नाही. नेदरलँडविरुद्ध त्याच्या पुनरागमनाची शक्यता होती पण ऑस्ट्रेलियाने धोका पत्करला नाही आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला मैदानात उतरवले. हेडला सुरुवातीला नो बॉल आणि फ्री हिट मिळाला आणि त्याचा फायदा घेत त्याने दोन षटकार ठोकले. येथून त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि 25 चेंडूत विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावले.
या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने 59 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अशाप्रकारे, तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला. या शतकीय खेळीत हेडने 10 चौकार आणि 7 षटकार मारले.
जर आपण ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान एकदिवसीय शतकाबद्दल बोललो, तर ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकातील नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 40 चेंडूत सर्वात वेगवान शतक ठोकले, जे विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक देखील आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु, ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी न्यूझीलंडचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी पहिल्या विकेट्ससाठी 175 धावांची सलामी भागिदारी केली. ऑस्ट्रेलिया संघाने 49.2 षटकात सर्वबाद 388 अशी मोठी धावसंख्या उभारली. (Travis Head set the record becoming the fourth player to do so)
म्हत्वाच्या बातम्या
सलामीवीरांच्या तडाख्यामुळे ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या! वाढला न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव
नेदरलँड्सने जिंकला टॉस, बांगलादेश करणार बॉलिंग; दोन्ही संघात एकूण 4 बदल, पाहा Playing XI