---Advertisement---

CWC 23 Points Table: पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना झटका, दक्षिण आफ्रिकेने भारताला पछाडले

SA-IND
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26वा सामना पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानच्या आशांवर पाणी फेरले. या पराभवामुळे पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही संपुष्यात आल्या आहेत. अशात त्यांना विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्येही तोटा झाला आहे.

दक्षिण आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये टॉपर
खरं तर, पाकिस्तान संघ या पराभवानंतर विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानचा 1 विकेटने नजीकचा पराभव करताच विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) मोठा बदल झाला. आफ्रिकेने भारतीय संघाला पछाडत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थान पटकावले. आफ्रिका संघाने 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 1 सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.

अशाप्रकारे 10 गुणांसह आफ्रिका संघ अव्वलस्थानी विराजमान झाला. खरं तर, त्यांचा नेट रनरेट सर्वाधिक +2.032 इतका आहे. पाकिस्तानच्या पराभवाने भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. भारताचेही 10 गुण आहेत. मात्र, नेट रनरेट +1.353 आहे, जो दक्षिण आफ्रिकेच्या नेट रनरेटपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच, पराभवानंतर पाकिस्तान संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी घसरण झाली. त्यांचे फक्त 4 गुण आहेत.

सामन्याचा आढावा
या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकात 270 धावा केल्या होत्या. यावेळी पाकिस्तानकडून सौद शकील (52) आणि बाबर आझम (50) यांनाच अर्धशतक करता आले. त्यांच्याव्यतिरिक्त शादाब खान यानेही 43 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना यावेळी तबरेज शम्सी याने सर्वाधिक 4 आणि मार्को यान्सेन याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, जेराल्ड कोएट्जीने 2, तर लुंगी एन्गिडीने 1 विकेट घेतली.

या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाच्याही नाकी नऊ आल्या. त्यांनी 47.2 षटकात 9 विकेट्स गमावत 271 धावा चोपत आव्हान पार केले. तसेच, सामना 1 विकेटने जिंकला. यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. (world cup 2023 points table south africa to top of latest points table india moves to second spot see here)

हेही वाचा-
‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान
चेपॉकवर रंगला वर्ल्डकपचा पहिला थ्रिलर! रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेची पाकिस्तानवर मात, महाराज ठरला हिरो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---