भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 208 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय डावाच्या पहिल्या 7 चेंडूंच्या आतच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन बाद झाले होते. मात्र, त्यानंतर ईशान किशनची बॅट तळपणार होती. भारतीय संघाने पहिल्या 2 षटकांत दोन गडी गमावून फक्त 8 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या षटकापासून ईशान किशनने (Ishaan kishan) न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडून काढायला सुरुवात केली. जकारी फाउल्क्सच्या या षटकात त्याने एकूण 24 धावा कुटल्या. त्यानंतर चौकार-षटकारांचा पाऊस सुरूच राहिला आणि आठव्या षटकातच टीम इंडियाने 100 धावांचा टप्पा ओलांडला.
ईशान किशनच्या बॅटमध्येही जणू स्प्रिंग लागल्यासारखी वाटत होती. न्यूझीलंडविरुद्धच्या या दुसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माचे ‘तूफान’ दिसले नाही, पण ईशानची ‘आंधी’ मात्र नक्कीच आली. त्याने कीवी गोलंदाजांविरुद्ध चौफेर फटकेबाजी करत केवळ 32 चेंडूत 76 धावा ठोकल्या. 237 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत ईशान किशनने एकूण 15 वेळा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर लावला.
याचबरोबर आजच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील शानदार फलंदाजी केली त्याने तब्बल 14 महिन्यानंतर अर्धशतक झळकावले आहे. आजच्या सामन्यात त्याने एकूण 37 चेंडूत 82 धावा केल्या. यावेळी त्याला शिवम दुबेने शानदार पद्धतीने साथ दिली. त्याने देखील 18 चेंडू 36 धावा झळकावल्या.
त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने 2 तर बाकी फलंदाज गोलंदाजांनी 1-1 विकेट घेतली.






