fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

किंग्स इलेव्हन पंजाबला सोडलेल्या या खेळाडूचे अनिल कुंबळेने मानले आभार; पहाच

आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणारा आर अश्विन आता दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे.

अश्विन दिल्लीकडून खेळणार असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स किंग्स इलेव्हन पंजाबला 1.5 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर, अष्टपैलू क्रिकेटपटू जगदीश सुचित आता किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे.

“आर अश्विनसाठी किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये संघाकडून खेळणे महत्त्वाचे होते.  परंतु, आता पुढचा विचार करण्याची वेळ आली आहे. आयपीएल लिलावा दरम्यान आम्ही आमचा संघ मजबूत करण्यावर लक्ष देऊ. त्यामुळे आमचा संघ खेळाडू समतोलपणा राखून आयपीएलच्या नव्या हंगामात उतरेल,” असे किंग्स इलेव्हन पंजाबचे क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले.

“मागील 2 वर्षात अश्विनने किंग्स इलेव्हन पंजाबसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. तसेच, त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो,” असेही कुंबळे म्हणाले.

किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना अश्विनने एकूण 28 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतले आहेत. यात त्याची 3/23ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

या 2 वर्षात अश्विनने गोलंदाजी व्यतिरिक्त फलंदाजीही उत्तम प्रकारे केली आहे. त्याने 144 धावा केल्या आहेत. तसेच, संघाला 12 वेळा विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे.

You might also like