भारतीय संघाला नुकताच 2024चा आयसीसी टी20 विश्वचषक ट्रॉफी (ICC T20 World Cup) जिंकून देणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) जगातील महान कर्णधारांमध्ये गणला जातो. पण रोहितच्या नावावर जरी आयसीसी ट्रॉफी असली तरी तो कोहलीच्या कर्णधारपदाच्या मागे आहे. कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली एक रेकाॅर्ड केला होता, जो रोहितला अजून मोडीता काढता आला नाही. मात्र भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत कोहलीचा रेकाॅर्ड मोडण्यात रोहित यशस्वी होईल की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. अशा परिस्थितीत कोहलीने 2017-18च्या मोसमात श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत आपला जबरदस्त फॉर्म दाखवला होता. त्या दरम्यान त्याने 3 कसोटी मालिकेत 3 शतके आणि 1 द्विशतक झळकावले. त्या काळात कोहलीने 5 डावात 610 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत हा रेकाॅर्ड गाठण्यासाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) आपली वनडे क्रिकेटमधील शैली दाखवावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहितने सातत्याने मोठी खेळी केली, तर कोहलीचा रेकाॅर्ड मोडीत निघू शकतो. मात्र, आतापर्यंत रोहितने कोणत्याही 3 कसोटी मालिकेत 500 धावांचा आकडाही गाठला नाही.
हेही वाचा-
PAK vs IND; “ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास…” पाकिस्तान कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; 15 चेंडूत अर्धशतक ठोकलेल्या ‘या’ स्टार खेळाडूवर दिल्ली खरचणार कोट्यवधी रूपये
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या यादीत, भारताच्या युवा खेळाडूचा समावेश!