IPL 2026: आयपीएल 2026चा लिलाव आता काही महिन्यांवर आला आहे आणि सर्व फ्रेंचायझी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज लिस्टवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत जर काही अनुभवी पण अलीकडच्या हंगामात अपयशी ठरलेल्या 5 भारतीय खेळाडूंना संघाने रिलीज करण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्यासाठी लिलावात खरेदीदार शोधणे खूप कठीण होऊ शकते, कारण संघ आता अधिक फिट आणि फॉर्मात असलेल्या युवा खेळाडूंकडे पाहत आहेत. (Players who might be released in IPL 2026)
1) अजिंक्य रहाणे: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला 1.5 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते. तसेच त्याला कर्णधारपदही सोपवले होते. 37 वर्षीय रहाणेची फलंदाजीची कामगिरी ठीकठाक राहिली. पण कर्णधार म्हणून तो संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकला नाही. दरम्यान केकेआरचा संघ पॉइंट टेबलमध्ये 8व्या क्रमांकावर राहिला. (Ajinkya Rahane KKR performance)
2) विजय शंकर: चेन्नई सुपर किंग्सने विजय शंकरला ऑक्शनमध्ये 1.2 कोटी रुपयांत घेतले होते. पण त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. विजयने एका अर्धशतकाच्या मदतीने 6 सामन्यांमध्ये 118 धावा केल्या. (Vijay Shankar CSK stats)
3) मोहित शर्मा: आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या मोहितचे वय सुमारे 37 वर्षे आहे. मोहितची आयपीएल 2025 मधील कामगिरी खूपच खराब होती. मोहितने 8 सामन्यांमध्ये जवळपास 129च्या सरासरीने आणि 11च्या इकॉनॉमी रेटने फक्त 2 विकेट्स घेतल्या. (Mohit Sharma IPL 2025)
4) ईशांत शर्मा: भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. 37 वर्षीय इशांतची कामगिरी खूपच खराब होती. इशांतने 7 सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याची सरासरी जवळपास 52 आणि इकॉनॉमी रेट 11च्या आसपास होता. (Ishant Sharma Gujarat Titans)
5) दीपक हुड्डा: चेन्नई सुपर किंग्समध्ये असलेल्या दीपक हुड्डाची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक राहिली. दीपकला 7 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या काळात दीपकने फक्त 31 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी 6.20 आणि स्ट्राइक रेट 75.61 होता. (Deepak Hooda CSK performance)






