क्रिकेट विश्वात आजपर्यंत अनेक जबरदस्त झेल पाहिले गेले आहेत. परंतु ११ ऑगस्ट २०२२ रोजी एक असा झेल पकडला गेला, जो पाहून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे आणि खेळाचे जाणकार त्याचे तोंड भरून कौतुक देखील करत आहेत. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या खेळाडूच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. इटली विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यातील एकदिवसीय सामन्यात हा झेल पकडला गेला आहे.
जियान रियेरोने पकडला हा जबरदस्त झेल –
११ ऑगस्ट २०२२ रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉंगकॉंगला पराभव स्वीकारावा लागला. इटलीचा खेळाडू जियान पियेरो (Gian Piero) यान एक अद्भुत झेल पकडला. गोलंदाज मनेंटी याच्या चेंडूवर हॉंगकॉंगच्या एहसान खान याने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूला व्यवस्थित टाईम करू शकला नाही. परिणामी चेंडू हवेत उंच उडाला. तसे पाहिले तर सर्वांना वाटत होते की, चेंडू जमिनीवर पडेल, ण जियान पियेरोने उत्कृष्ट डाईव्ह मारली आणि चेंडू जमिनीवर पडण्याआधी झेलला. त्याचा हा झेल पाहून मैदानातील प्रत्येकजण हैराण होता
आयसीसीने शेअर केली पोस्ट –
आयसीसीने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहते हा झेल पाहून रिएक्ट होत आहेत. पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक झेल आहेत, ज्यांना सर्वकालीन सर्वोत्तम समजले जात आहे. अनेकांच्या मते पियेरोने पकडलेला हा झेल देखील त्या यादीत सहभागी झाला आहे.
https://www.instagram.com/reel/ChJjC1ClYxU/?utm_source=ig_web_copy_link
इटलीने जिंकला रोमांचक सामना –
सामन्याचा विचार केला, तर इंटलीने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात २५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात २५५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हॉंगकॉंग संघ मैदानात आला आणि ४९.१ षटकात सर्वबाद झाला. हॉंगकॉंगने यादरम्यान २५० धावा केल्या आणि ४ धावांच्या अंतराने सामना गमावला. सामन्यात जियान पियेरोची चांगलीच चर्चा झाली, ज्याने जबरदस्त झेल पकडून संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा –
महत्वाच्या बातम्या –
INDvsZIM | कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकांचीही बदली, व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर ‘हे’ २ दिग्गज पाहतील काम
सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय बॉयकॉट सौरव गांगुली?
ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर