---Advertisement---

विजयाचा उन्माद! उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर खेळाडूंनी भर मैदानात काढल्या पॅन्ट

On: शनिवार, जुलै 3, 2021 6:43 PM
---Advertisement---

युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीला शुक्रवारपासून (२ जुलै) सुरुवात झाली. पेनल्टी शूट आउटपर्यंत ताणल्या गेलेल्या पहिल्याच उपांत्यपूर्व सामन्यात तगड्या स्पेनने स्वित्झर्लंडला ३-१ ने पराभूत केले. तर, दुसऱ्या सामन्यात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या इटलीने अपेक्षित कामगिरी करत बेल्जियमवर २-१ असा विजय संपादन केला. मात्र, उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर इटलीच्या काही खेळाडूंनी मैदानावर अत्यंत बीभत्स कृत्य केले.

इटलीने मिळवला विजय
संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकही पराभव अथवा ड्रॉ न पाहिलेल्या इटली संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिल्या सत्रातच दोन गोल करत सामन्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. निकोलो बरेला याने ३१ व्या तर, लोरेन्सो इनसिगे याने ४४ व्या मिनिटाला हे गोल केले. बेल्जियमकडून पहिले सत्र संपण्याच्या अखेरीस रोमेलु लूकाकू याने गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सामन्यात त्यानंतर एकही गोल न झाल्याने इटलीने दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

https://www.instagram.com/p/CQ07o7QCe_C/?utm_source=ig_web_button_share_sheet

इटलीच्या खेळाडूंचा उन्माद
बेल्जियमवर विजय मिळवल्यानंतर इटलीचे काही खेळाडू अत्यंत ओंगळवाणा जल्लोष करताना दिसून आले. जीओनी डी लॉरेन्स सो, ऍड्रीया बेलोटी व ऍलेझॅन्ड्रो बास्टोनी यांनी चक्क भर मैदानात, कॅमेरासमोर आपली पॅन्ट काढून प्रेक्षकांत भिरकावली. त्यांच्या या कृत्याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

स्पेनने मिळवला पहिल्या सामन्यात विजय
तीन वेळा युरो कप जिंकणाऱ्या स्पेनने पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडवर पेनल्टी शूट आउटमध्ये विजय मिळवला. निर्धारित वेळेत व त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये १-१ अशी बरोबरी राहिल्यानंतर, पेनल्टी शूट आउटमध्ये ३-१ अशा फरकाने विजय मिळवून स्पेन उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ बनला. त्यांचा सामना इटलीसोबत ७ जुलै रोजी वेम्बली स्टेडियमवर खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! बीसीसीआयने केली देशांतर्गत हंगामाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

मोठी बातमी! इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका

सहकाऱ्याकडून कोहलीची स्तुती; म्हणे, ‘इतर खेळाडू १०० टक्के देतात, पण तो २०० टक्केच्या प्रयत्नात असतो’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---