---Advertisement---

लागोपाठ तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपसाठी इटली अपात्र, 4 वेळेच्या चॅम्पियनच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

On: बुधवार, एप्रिल 1, 2026 10:03 AM
---Advertisement---

इटली फुटबॉल संघ पुन्हा एकदा फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. चार वेळेचा विश्वविजेता इटली संघ २०२६ च्या फिफा विश्वचषकात दिसणार नाही. मंगळवारी (३१ मार्च) झालेल्या प्लेऑफच्या अंतिम सामन्यात त्यांना बॉस्निया आणि हर्झेगोविनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा इटली फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरु शकला नाही.

त्याचबरोबर इटलीने एक विक्रमही आपल्या नावे केला आहे. सलग तीन वेळा विश्वचषकासाठी पात्र न ठरणारा संघ हा लाजिरवाणा विक्रम इटलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. इटलीने शेवटचा विश्वचषक २०१४ मध्ये खेळला होता.

सामना सुरू झाला असला इटलीने १५ व्या मिनिटाला गोल करत १-० अशी आघाडी घेतली. मोईस कीन याने तो गोल केला. त्यानंतर ही आघाडी ७८ व्या मिनिटापर्यंत राहिली. ७९ व्या मिनिटाला बोस्निया आणि हर्झेगोविनाकडून हॅरिस ताबाकोविच याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत केला. अतिरिक्त वेळेत गेलेल्या या सामन्यात त्या ३० मिनिटांमध्ये एकाही संघाल गोल करता आला नाही आणि त्याचा निकाल पेनाल्टी शूटआऊटमध्ये लागला. तेथे इटली १-४ असा पराभूत झाला. त्याचबरोबर इटलीचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले.

या सामन्याआधी इटलीने नॉर्थर्न आयर्लंडचा २-० असा पराभव केला होता.

इटलीची विश्वचषकाच्या इतिहासातील कामगिरी
इटलीने चार वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे. त्यांनी शेवटचा विश्वचषक २० वर्षांपूर्वी म्हणजे २००६ मध्ये जिंकला होता. त्याआधी त्यांनी १९३४, १९३८ आणि १९८२ मध्ये विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. २००६ चा विश्वचषक जिंकल्यानंतर मात्र इटलीची कामगिरी वाईट झाली. २०१० आणि २०१४ मध्ये ते साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले. नंतर ते २०१८ आणि २०२२ च्या स्पर्धेसाठीही अपात्र ठरले होते.

बोस्निया मात्र २०१४ मध्ये पदार्पण केल्यानंतर १२ वर्षांनी फिफा विश्वचषकात परतत आहे. ते २०२६ च्या फिफा विश्वचषकामध्ये यजमान कॅनडा, कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यासह गट-ब मध्ये आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---