ईटली वर्ल्डकपच्या पात्रता फेरी मधून बाहेर पडली आणि त्यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा आधारस्तंभ ४० वर्षीय गोलकीपर जीजी बुफाॅनने अंतरराष्ट्रीय फुटबाॅल मधून निवृत्ती घोषित केली.
या वर्ल्डकप नंतर निवृत्ती घेणार असल्याचे आधीच त्याने सांगीतले होते पण त्याची कारकीर्द अशी संपुष्टात येईल असा विचार सुद्धा कोणी केला नव्हता. स्वीडनकडून ईटलीला २ सामन्यात १-० ने पराभव पत्करावा लागला आणि वर्ल्डकप साठी पात्र होता आले नाही.
बुफाॅनने ईटली संघाकडुन जरी निवृत्ती घेतली असली तरी जुवेंटस क्लबकडून तो खेळणार आहे. ईटली संघात २० वर्षापूर्वी १९९७ साली पहिला सामना खेळणाऱ्या बुफाॅनने १७५ सामने खेळले.
त्यात ५ वेळा वर्ल्डकप मध्ये बुफाॅनचा समावेश होता तर १ वर्ल्डकप जिंकण्यात त्यांना यश आले होते. २००६ साली ईटली संघाने अंतिम सामन्यात पेनल्टी शुटआऊट मध्ये फ्रांन्सचा ५-३ ने पराभव केला होता. त्या आधी ९० मिनिट आणि ३० अतिरिक्त मिनिट मध्ये १-१ ने दोन्ही संघांनी बरोबरी साधली होती.
बुफाॅनला २००६ आणि २०१२ या दोन्ही वर्षी गोलकीपर ऑफ दी टुर्नामेंटच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते तर ४ वेळा त्याने युएफा युरो मध्ये पात्र झाला होता. १७५ सामन्यात ६८ वेळा बुफाॅनने समोरच्या संघाला गोल करु दिला नव्हता.
बुफाॅन बरोबरच ईटलीच्या डी रोसी, बारझाकी आणि चेलीनीने सुद्धा निवृत्तीची घोषणा केली. बुफाॅन हा २००६ च्या विश्वविजेत्या संघाचा शेवटचा खेळाडू होता जो ईटलीकडून खेळत होता.
शेवटच्या सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बुफाॅन रडत होता आणि म्हणाला ईटलीचे भविष्य सुरक्षित हातात आहे जे स्वत:साठी बोलु शकतात आणि ते मला माझ्या निवृत्ती नंतर मला निराश करणार नाही. हा माझा ईटलीसाठी शेवटचा सामना होता आम्ही प्रयत्न केला आम्हाला माफ करा.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)