---Advertisement---

“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया

---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीश बनले. कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम याला ९.२५ कोटी रुपये देत चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना गौतमने धोनीचे कौतुक केले आहे.

गौतमवर लागली मोठी बोली

आयपीएल २०२१ च्या लिलावात कृष्णप्पा गौतमवर तब्बल ९.२५ कोटी इतकी मोठी बोली लागली. त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये चढाओढ लागली होती. मात्र, अखेरीस चेन्नईने बाजी मारली. या रकमेसह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ‘अनकॅप्ड’ खेळाडू बनला आहे.

गौतमने दिली प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्स संघातील आपल्या निवडीनंतर गौतमने प्रतिक्रिया देत आपण धोनीसोबत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. गौतमने म्हटले, “मी आयपीएल कारकिर्दीची सुरुवात राजस्थान रॉयल्समधून केली. त्यावेळी मी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळलो. तर, मागील वर्षी पंजाबमध्ये असताना केएल राहुल माझा कर्णधार होता. ते दोघेही उत्तम कर्णधार आहेत. आता मी धोनीच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्सुक आहे.”

धोनीविषयी बोलताना गौतम पुढे म्हणाला, “माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मला कायम धोनीच्या संघाचा भाग व्हायचे होते. त्याने भारताला दोन विश्वचषक तर चेन्नईला तीन आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. हा नक्कीच शानदार अनुभव असेल.”

गौतमने या मुलाखतीत मागील आयपीएल हंगामात आपण धोनीची स्वाक्षरी घेतली असल्याची आठवण सांगितली. तसेच, आमच्यात या दरम्यान क्रिकेटवर काही वेळी चर्चा झाल्याचे तो म्हणाला.

गौतमने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत २४ सामने खेळताना १३ बळी मिळवले आहेत. कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर २०१८ आयपीएल लिलावावेळी ६ कोटी २० लाख रुपयांची बोली लागल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

“आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना डावलले जाते”, माजी क्रिकेटपटूने केला मोठा आरोप

चमिंडा वासने तीन दिवसातच प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने उडाली खळबळ; ‘हे’ आहे कारण

ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---