भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता कोणत्याही क्रिकेट प्रकारामध्ये कर्णधार नाही. त्याने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-१ ने पराभव झाला. विराट सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला असतो. कोहलीला दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही. तो आता बीसीसीआयसोबतच्या गैरसमजामुळे तो वादातही सापडला आहे. याशिवाय त्यांची मुलगी वामिका हीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तो त्या चिंतेत आहे. कोहलीच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग वाट पाहत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीला शतक झळकावता आले नाही. कोहली आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत शतक लगावणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Its always you vs you. pic.twitter.com/9zBG8O95Qp
— Virat Kohli (@imVkohli) January 30, 2022
नुकताच कोहलीने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कोहलीने त्याच्या फोटोला दिलेले कॅप्शन त्याच्या चाहत्यांना खूप आवडले दिसत आहे. विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आरशासमोर उभा आहे आणि कॅप्शनमध्ये ‘तुमचा मुकाबला हा नेहमी स्वत:शी असतो’, असं लिहिले आहे. कोहलीने हा फोटो शेअर करून स्वतःला प्रेरित केले आहे. त्याच्या या फोटोला ३२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत.
आता कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेत दिसणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा संघांचे नेतृत्व करणार असून, त्याच्या नेतृत्वाखाली कोहली पहिल्यांदाच खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना ९ आणि ११ फेब्रुवारीला होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली नक्कीच शतक झळकावू शकतो, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन दिग्गजाकडून विराटचे कौतुक; तर रूटबाबत केले मोठे वक्तव्य (mahasports.in)
शुबमन गिलला रिलीज केल्याचा केकेआरला होतोय पश्चाताप! कोच मॅक्युलम म्हणाला… (mahasports.in)
‘या’ आहेत आयपीएल संघांच्या सर्वात सुंदर मालकिणी; कोणी अभिनेत्री तर कोणी… (mahasports.in)