ऍशेस 2023 मालिकेबाबत इंग्लंडच्या वाढत्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. दुखापतींमुळे इंग्लंडचे गोलंदाज एकापाठोपाठ एक मालिकेतून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत आता या यादीत जॅक लीचचे नाव जोडले गेले आहे. जो पाठीच्या दुखण्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.
आयर्लंड विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी
लीचने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून चार विकेट घेतल्या. ज्यावर इंग्लंडने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचा भाग असलेल्या लीचने गेल्या वर्षी एकूण 46 कसोटी बळी घेतले आहेत. (Ashes 2023)
ऍशेसपूर्वी इंग्लंडच्या अडचणी वाढल्या
ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने शनिवारी जाहीर केलेल्या 16 जणांच्या संघात लीचची निवड करण्यात आली आहे. सामन्याच्या आधी लीचला झालेली दुखापत ही इंग्लंडसाठी मोठा धक्का देणारी गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही (Jofra Archer) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता. याआधी जेम्स अँडरसनही (James Anderson) दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. अशा स्थितीत ऍशेस पूर्वी इंग्लंडच्या वाढत्या अडचणी हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
नवीन खेळाडू लवकरच जाहीर केले जातील
आयर्लंडविरुद्ध इंग्लंडच्या विजयादरम्यान लीचला अचानक पाठदुखीचा त्रास सुरु झाला आहे. यादरम्यान, रविवारी स्कॅन केल्यानंतर लीचच्या फ्रॅक्चरची माहिती समोर आली. त्याला ऍशेस कसोटी मालिकेतून बाहेर व्हावे लागले. इंग्लंड संघात लीचची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव लवकरच जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले आहे. ऍशेस मालिकेतील पहिला सामना 16 जून रोजी एजबॅस्टन येथे खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?