येत्या काही दिवसात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ॲशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. मानाची मालिका असल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. अशातच इंग्लंड फिरकीपटू ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारण्यासाठी भारतीय गोलंदाजाची मदत घेताना दिसून येत आहे.
भारतीय संघाने २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात रवींद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली होती. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे इंग्लंड संघाचा फिरकीपटू जॅक लीच रवींद्र जडेजाचे व्हिडिओ पाहून सराव करण्यात व्यस्त आहे. इंग्लंड संघासाठी जॅक लीचने आतापर्यंत एकूण १६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ६२ गडी बाद करण्यात यश आले आहे.
जॅक लीचने म्हटले की, “हे पाहून आनंद झाला. तो जे करतो त्याने तेच केले आणि यश देखील मिळवले. तसेच मी गेल्या अनेक वर्षांपासून नॅथन लायनला फॉलो करतोय. त्याची स्टॉक गोलंदाजी खूप चांगली आहे. मुख्यतः तिथे जिथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही. त्या खेळपट्टीवर तो अतिरिक्त उसळी आणि इतर गोष्टींवर तोडगा शोधून काढण्याच्या प्रयत्नात असतो.”
आठ डिसेंबर पासून सुरू होणार कसोटी मालिका
येत्या ८ डिसेंबर पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना पार पडणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी बोलताना जॅक लीच म्हणाला की, “मी माझ्या गोलंदाजीमध्ये या प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, माझ्या बलस्थानांवर देखील टिकून आहे.”
तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स फिट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे इंग्लंड संघ आणखी मजबूत संघ होऊ शकतो. यापूर्वी झालेल्या दोन्ही ॲशेस मालिकेत इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंड संघ या मालिकेत आणखी जोर लावताना दिसून येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार ‘हा’ खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी
टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय