पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटनजिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटातभारताच्या मन शहा, ग्रेट ब्रिटनच्या या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात भारताच्या दुसऱ्या मानांकित मन शहाने प्रभजीत सिंग चंढोकचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव केला. ग्रेट ब्रिटनच्या जॅक पिनिंगटनजॉन्स याने कार्तिक सक्सेनाचे आव्हान 6-2, 6-2 असे मोडीत काढले.
दुहेरीत पहिल्या फेरीतमुलींच्या गटात भारताच्या मल्लिका मराठेने जपानच्या मई हसिगावाच्या साथीत दुसऱ्या भारताच्या दुसऱ्या मानांकित शिवानी अमिनेनी व शरण्या गवारे याजोडीचा 6-1, 6-3असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. ऋतुजा चाफळकर व हृदया शहा यांनी सराह देव व मुस्कान गुप्ता यांचा 6-2, 6-4असा पराभवकेला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
जॅक पिनिंगटनजॉन्स(ग्रेट ब्रिटन)वि.वि.कार्तिक सक्सेना(भारत)6-2, 6-2;
मन शहा(भारत)(2)वि.वि.प्रभजीत सिंग चंढोक(भारत)6-1, 6-1;
दुहेरी गट: पहिली फेरी: मुले:
देव जाविया/मन शहा(भारत) वि.वि.संजीत देवीनेनी/फैज नस्याम(भारत) 6-2, 6-2;
सिद्धांत बांठिया/मधवीन कामत(भारत)(3)वि.वि.सुशांत दबस/दर्शन सुरेश 6-2, 6-2;
कसीदीत समरेज(थायलंड)/सच्चीत शर्मा(भारत)(2)वि.वि.सुहित रेड्डी लंका/कार्तिक सक्सेना(भारत) 6-1, 6-0;
प्रसस्ना बागडे/आर्यन भाटिया(भारत)वि.वि.लँसिलेत कार्नेलो(स्वीडन)/नथ्यूत एन.(थायलंड) 7-5, 6-4;
अरुण वेंकट गुरुस्वामी/आदित्य बलसेकर(भारत)वि.वि.अर्जुन गोहड/सिद्धार्थ जडली(भारत) 6-4, 6-4;
मुली:
मातीलदा मुटावडेझीक/इरिन रिचर्डसन (ग्रेट ब्रिटन)(1)वि.वि.विपाशा मेहरा/भक्ती परवानी(भारत) 6-1, 6-2;
मई हसिगावा(जपान)/मल्लिका मराठे(भारत)वि.वि.शिवानी अमिनेनी/शरण्या गवारे(भारत)(2) 6-1, 6-3;
सालसा आहेर/एरिकामत्सुदा (जपान)(4)वि.वि. जगमीत कौर ग्रेवाल/प्रेरणा विचारे(भारत) 7-6(2), 6-2;
ऋतुजा चाफळकर/हृदया शहा(भारत)वि.वि.सराह देव/मुस्कान गुप्ता(भारत) 6-2, 6-4.