दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिस, पाकिस्तानचा महान फलंदाज जहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार लिसा स्थळेकर यांचा आज (२३ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. Jacques Kallis, Zaheer Abbas And Lisa Sthalekar Name Included In ICC Hall Of Fame
क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक असणाऱ्या कॅलिसने दक्षिण आफ्रिकेकडून १९९५ ते २०१४ दरम्यान क्रिकेट खेळले होते. दरम्यान त्याने एकूण १६६ कसोटी सामने खेळत १३२८९ धावा केल्या होत्या. तर, २९२ विकेट्सही घेतल्या होत्या. वनडेत त्याने ३२८ सामन्यात ११५७९ धावा आणि २७३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपात म्हणजेच टी२० क्रिकेटमध्ये कॅलिसने २५ सामने खेळत ६६६ धावा आणि १२ विकेट्स आपल्या खात्यात नोंदवल्या होत्या.
आयसीसीने कोव्हिड-१९ महामारीमुळे व्हर्च्युअल समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये कॅलिसव्यतिरिक्त त्याचा संघसहकारी शॉन पोलॉक आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर हेदेखील सहभागी झाले होते. २००९ला आयसीसी हॉल ऑफ फेम (ICC Hall Of Fame)मध्ये सामाविष्ट झालेले गावसकर कॅलिसविषयी बोलताना म्हणाले, “तो एक विशाल व्यक्तित्व आहे. हा शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. तो आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी होण्याचा खरा हक्कदार होता.”
तसेच, गावसकर यांनी पुण्यात जन्मलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटू लिसाचीही प्रशंसा केली. लिसाविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “ही खूप चांगली गोष्ट आहे की, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये अजून एका ‘कर’ चा समावेश झाला आहे. शानदार, तू केवळ ऑस्ट्रेलियाची नव्हे तर भारताचीही प्रेरणास्रोत आहेस.”
लिसाने ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी सामने खेळत ४१६ धावा आणि २३ विकेट्स घेतल्या होत्या. तर, वनडेत तिने १२५ सामन्यात २७२८ धावा आणि १४६ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय टी२० क्रिकेटमध्ये ५४ सामने खेळत ७६९ धावा आणि ६० विकेट्स घेतल्या होत्या. लिसाने केवळ ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्वच केले नाही तर ती वनडे आणि टी२० अशा ४ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भागदेखील होती.
🎖️ #ICCHallOfFame | Class of 2020 ⭐
🇿🇦 Jacques Kallis
🇦🇺 Lisa Sthalekar
🇵🇰 Zaheer Abbas pic.twitter.com/Wtc9qxkTeL— ICC (@ICC) August 23, 2020
गावसकर यांनी ‘आशियाई ब्रॅडमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्बास यांच्याविषयी बोलताना म्हटले की, “मी खूप आनंदी आहे. याचा त्याच्यापेक्षा जास्त दूसरा कोणीही हक्कदार नव्हता. मला माहिती नाही की, त्याला हा सन्मान मिळण्यामध्ये एवढा वेळ का लागला, पण कधीही न होण्यापेक्षा उशीरा बरे. मी जेव्हाही त्याला फलंदाजी करताना पाहायचो तेव्हा मला खूप आनंद व्हायचा, मग तो आमच्याविरुद्ध खेळत असला तरी तो आनंद बदलत नसे.”
अब्बास यांनी पाकिस्तानकडून एकूण ७८ कसोटी सामने खेळले होते. त्यात त्यांनी १२ शतके मारत ५०६२ धावा केल्या होत्या. तर, ६२ वनडे सामने खेळत ७ शतकांच्या मदतीने २५७२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
-बीसीसीआय ‘हंड्रेड टूर्नामेंट’ आयोजित करण्यास उत्सुक, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा
ट्रेंडिंग लेख –
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-असे ५ प्रसंग जेव्हा खेळाडूंच्या अति आत्मविश्वासामुळे झाले संघाचे नुकसान
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ खेळाडूंच्या जाण्याने कोलकाता नाईट रायडर्सला झेलावे लागू शकते मोठे नुकसान