---Advertisement---

IND vs ENG: जडेजाची लॉर्ड्सवर शानदार कामगिरी, 93 वर्षांनंतर रचला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम!

On: सोमवार, जुलै 14, 2025 9:39 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासात काही अशा खेळी असतात ज्या संघाच्या विजय-पराजयाच्या पलिकडच्या असतात. अशा खेळी वर्षानुवर्षे लोकांच्या मनात कायम राहतात. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अशीच एक संस्मरणीय खेळी खेळत आहे. इंग्लंडचा विजय आणि भारताचा पराभव याच्या मध्ये जडेजा टीम इंडियासाठी लढत आहे.

एकामागोमाग एक फलंदाज त्याची साथ सोडून परतत आहे, पण जडेजा खंबीरपणे क्रीजवर टिकून आहे. इंग्लंडची वेगवान गोलंदाजी जडेजासमोर निष्प्रभ वाटत आहे. तसेच लॉर्ड्सवर शानदार खेळी करत जडेजाने त्याच अर्धशतकही पूर्ण केले आहे.

अर्धशतक पूर्ण करताच जडेजानी लॉर्ड्सवर असा विक्रम केला, जो गेल्या 93 वर्षांत कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमला नव्हता. रवींद्र जडेजाने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात 72 धावांची दमदार खेळी केली होती. दुसऱ्या डावातही तो टी-ब्रेकपर्यंत 56 धावांवर नाबाद आहे. लॉर्ड्सवर दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा जडेजा हा फक्त दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याआधी हे यश 93 वर्षांपूर्वी वीनू मांकड यांनी मिळवले होते. 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना वीनूंनी दोन्ही डावात अर्धशतक झळकावले होते.

जडेजाने अतिशय शानदार फलंदाजी करताना नीतीश कुमार रेड्डीसोबत आठव्या विकेटसाठी 30 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. त्यानंतर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) त्याला चांगली साथ मिळाली आणि दोघांनी नवव्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या. टी-ब्रेकपर्यंत जडेजा 162 चेंडू खेळून 4 चौकार आणि 1 षटकार ठोकून नाबाद खेळत आहे.

कसोटी सामन्यात पाचव्या दिवसाची सुरुवात भारतीय संघासाठी फारशी चांगली झाली नाही. जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) टाकलेल्या जबरदस्त चेंडूवर रिषभ पंत (Rishbh Pant) क्लीन बोल्ड झाला. पंत माघारी गेल्यावर केवळ 10 धावा जास्त करण्यात आल्यानंतर के एल राहुल 39 धावा करून बेन स्टोक्सचा बळी ठरला. फक्त एक धावा पुढे गेल्यावर आर्चरने वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर बाद केले. नीतीश कुमार रेड्डी देखील फक्त 13 धावा करून परतला. बुमराहने मात्र जबरदस्त संयम दाखवून 54 चेंडू खेळून 5 धावा केल्या, पण मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात त्यालाही माघारी जावे लागले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---