भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. यासह, भारतीय संघ आता ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने पुढे आहे. दरम्यान, लॉर्ड्स कसोटी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच केएल राहुलच्या दिशेने प्रेक्षकांमधून शॅम्पेन कॉर्कही फेकण्यात आले. आता याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत होता. यावेळी भारताचा केएल राहुल थर्ड मॅन बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी डावाचे ६९ व्या षटक सुरु असताना प्रेक्षकांमधून काही जणांनी शॅम्पेन कॉर्क (बॉटलची झाकणे) केएल राहुलच्या दिशेने फेकून मारले होते.
याबद्दल केएल राहुलने भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे तक्रार केली होती. स्लीपला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने याबद्दल निराशा व्यक्त करत केएल राहुलला इशाऱ्याने ते कॉर्क पुन्हा प्रेक्षकांमध्ये फेकण्यास सांगितले होते. केएल राहुलनेही कर्णधाराचा सल्ला ऐकत कॉर्क प्रेक्षकांमध्ये फेकले होते.
Champagne cork !!
Cheap from England fans #ENGvIND pic.twitter.com/5Jd6HZEu9C
— HITMAN (@MGR_VJ) August 14, 2021
या घटनेची आठवण करुन देत वासीम जाफरने सचिनचे एक विधान ट्विट केले आहे. त्याने लिहिले की, “सचिनचे विधान – लोक दगड फेकतील, तुम्ही त्यांना मैलाचे दगड बनवा.’ हा विजय मैलाचा दगड आहे. याबद्दल विराट कोहली आणि भारतीय संघाचे अभिनंदन.”
To borrow a quote from @sachin_rt, "People throw stones, you turn them into milestones". This is a milestone victory, congratulations @imVkohli and Team India @BCCI 🇮🇳👏🏻 #ENGvIND pic.twitter.com/3i2HGzgPER
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 16, 2021
या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. या सामन्यात केएल राहुल (१२९) च्या शतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. त्याला, प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने कर्णधार जो रूट (१८०*) च्या शानदार खेळीच्या आधारे पहिल्या डावात ३९१ धावा केल्या होत्या. यानंतर भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडचा दुसरा डाव ५१.५ षटकांत १२० धावांवर संपुष्टात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानात घुसलेल्या ‘त्या’ प्रेक्षकाला जडेजाने विचारलेला ‘हा’ प्रश्न
क्या बात!! मोहम्मद शमीचा ९२ मीटर लांब षटकार मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ
तालिबानी संकटानंतर अफगाणी क्रिकेटर उर्वरित आयपीएल खेळणार का? सनरायझर्स हैदराबादकडून आले उत्तर