भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. क्रिकेटजगतातील प्रत्येक गोलंदाजाला विराटविरुद्ध गोलंदाजी करत त्यांचे गोलंदाजी कौशल्य पारखायचे असते. अशात बांग्लादेशची महिला क्रिकेटपटू जहानारा आलमने तिची इच्छा व्यक्त करत म्हटले आहे की, तिला विराटला बाद करायचे आहे. Jahanara Alam Wants To Out Virat Kohli
जहानारा म्हणाली की, “आयपीएलमध्ये तिचा आवडता संघ कोलकाता नाईट रायडर्स हा आहे. पण, ती सनराइजर्स हैद्राबाद संघाला सपोर्ट करते. कारण, तिचा भाऊ शाकिब हा सनराइजर्सचा भाग आहे. पण, आयपीएल २०२०मध्ये तिचा भाऊ शाकिब खेळणार नसल्यामुळे ती केकेआरला सपोर्ट करेल. मी हे सांगू शकत नाही की, मला केकेआर हा संघ का एवढा आवडतो. पण, आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून केकेआर हाच आयपीएल संघ मला आवडतो.”
२७ वर्षीय जहानारा पुढे बोलताना म्हणाली की, “मला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीला बाद करायचे आहे. याबरोबरच माझे अजून एक स्वप्न आहे. ते म्हणजे कोलकाताच्या ईडन गार्डन आणि इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर क्रिकेट सामना खेळण्याचे. क्रिकेटमधील अनेक दिग्गज या मैदानावर खेळले आहेत. त्यामुळे मलाही एकदा तरी या मैदानांवर खेळायचे आहे.”
वेगवान गोलंदाज जहानाराने २६ नोव्हेंबर २०११ ला आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने ३७ वनडे सामने खेळत ३३ विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्ये ७१ सामने खेळत तिने ५५ विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काहीही होऊ द्या! या वर्षापर्यंत धोनीचं राहाणार सीएसकेचा कर्णधार
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…
कोरोनानंतर झाला पहिलाच टी२० सामना, ११ पैकी १० खेळाडूंना नाही करता आल्या दहा धावा
ट्रेंडिंग लेख –
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज