---Advertisement---

क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…

On: गुरूवार, ऑगस्ट 13, 2020 3:55 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर युएईत करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलमध्ये नवनवे विक्रम बनताना आणि जुने विक्रम मोडताना दिसतील.

आयपीएल इतिहासात आजवर अनेक अश्या विक्रमांची नोंद झाली आहे, ज्यांनी सर्वांना चकित केले आहे. अशाच विक्रमांपैकी एक विक्रम म्हणजे,  क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आयपीएल संघाचा सामना. आयपीएलच्या सर्व संघांमध्ये हा विक्रम केवळ एका संघाने केला आहे. तो संघ म्हणजे, आयपीएलच्या पहिल्या हंगमाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स. Rajsthan Royals Is The Only IPL Team Which Play On Lords

२००९ साली इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मिडलसेक्स संघात टी२० क्रिकेट सामना झाला होता. आयपीएल इतिहासात राजस्थान हा एकमेव संघ आहे, ज्याने परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना खेळला आहे.

६ जुलै २००९रोजी ब्रिटिश एशियन चषक अंतर्गत मैत्रिपूर्ण टी२० सामना खेळला गेला होता. या सामन्यातून जेवढी रक्कम जमा झाली होती, ती ब्रिटिश एशियन ट्रस्टला देण्यात आली होती. या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू मुरली कार्तिक हा मिडलसेक्स संघाचा भाग होता. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न होता. तर, मिडलसेक्सचे नेतृत्त्व शॉन उदल करत होता.

त्या दिवस-रात्र सामन्यात मिडलसेक्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. यावेळी दूसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या स्वप्निल आसनोडकरने ४० चेंडूत ४१ धावांची दमदार खेळी केली होती. तर, मोहम्मद कैफनेही ३५ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. शिवाय, अलावना दिमित्री मस्कारेन्हास याने १६ चेंडूत केलेल्या ३२ धावांमुळे संघाचा डाव ५ बाद १६२ धावांवर संपला होता.

मिडलसेक्स संघाने राजस्थान रॉयल्सच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ ११६ धावा केल्या होत्या. मिडलसेक्सकडून फक्त डीजे मलान चांगल्या धावा करु शकला होता. मलानने ३४ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज सोहेल तन्वीरने ३ आणि मस्कारेन्हासने २ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्सने तो सामना ४६ धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

वेबसिरीज पाहून कंटाळलात, या चॅनेलवर तुम्ही घेऊ शकता कॅरेबियन प्रीमियर लीगचा आनंद, वेळ आहे..

स्वातंत्र्य दिनी सचिन तेंडुलकर आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टोक्सच्या जागी या क्रिकेटरला मिळाली संधी

ट्रेंडिंग लेख –

मला रोज २ ग्लास उसाचा रस द्या, पाकिस्तानकडून खेळायला लागल्यावर तु्म्हाला उसाचा रस काढायची मशीन देईल!

भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार

कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---