भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय असतील. जय शहा वयाच्या 36व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शहापूर्वी भारतातील इतर दिग्गजांनी हे पद सांभाळले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जय शहा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता (1 डिसेंबरला) जय शाह पद स्वीकारतील.
आयसीसीचे (ICC) विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ (30 नोव्हेंबरला) संपत आहे. यानंतर जय शाह (Jay Shah) हे पद स्वीकारतील. (20 ऑगस्ट) रोजी आयसीसीनं याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. बार्कले 2020 पासून या पदाची जबाबदारी सांभाळत होते.
जय शाह (Jay Shah) यांच्या आधी 4 भारतीय आयसीसीचे अध्यक्ष होते. जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार अध्यक्ष होते, तर एन श्रीनिवासन 2014-15 मध्ये अध्यक्ष होते. तर शशांक मनोहर 2015-2020 पर्यंत अध्यक्ष होते. वास्तविक, 2015 पूर्वी आयसीसी प्रमुखांना अध्यक्ष म्हटले जायचे. मात्र यानंतर त्यांना चेअरमन म्हटले जाऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
कडवट शेवटानंतरही डेविड वॉर्नरला आली हैदराबादची आठवण, व्यक्त केली खेळण्याची इच्छा?
एकाच वर्षात झळकावली 9 शतकं! पाकिस्तानी खेळाडूची धमाकेदार कामगिरी
दिनेश कार्तिकचे धवनच्या पावलावर पाऊल, आता ‘या’ क्रिकेट लीगमध्ये करणार धमाका