जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे आयपीएल 2023 स्पर्धेचा 26वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा लखनऊ सुपर जायंट्स संघाने 10 धावांनी पराभव केला. राजस्थानने सामना तर गमावलाच, पण सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी स्टेडिअममध्ये नाटकीय घटनाक्रम पाहायला मिळाला. स्टेडिअममध्ये पोहोचलेले राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चांदना यांनी येथे कायमस्वरूपी बांधण्यात आलेल्या गोष्टींवर आक्षेप घेतला. तसेच, राजस्थान संघावर नाराजी व्यक्त केली.
क्रीडा मंत्री अशोक चांदना (Ashok Chandna) म्हणाले की, “इथे ज्या कायमस्वरूपी किंवा तात्पुरते बांधकाम केले आहे, ते नियम आणि कायद्याच्या पलीकडे आहे.” या बांधकामांना अतिक्रमण मानत त्यांना उद्ध्वस्त करणे आणि स्टेडिअमच्या कार्यालयांपुढे बनवण्यात आलेल्या बॉक्स आणि छतावर जाणाऱ्या रस्त्यांवर टाळे लावण्यात आले.
यानंतर राजस्थान आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळून सामना सुरू होण्यापूर्वीच या वादावर तोडगा काढला. क्रीडा मंत्री म्हणाले की, राजस्थानने नियमानुसार, रक्कम जमा करण्याबाबत चर्चा केली आहे. ते पुढील सामन्यापूर्वी पूर्ण रक्कम क्रीडा विभागाकडे जमा करणार आहेत. सरकारी रक्कम मिळल्यानंतर त्यांना कोणतीही समस्या नसेल.
क्रीडा मंत्र्यांचा आक्षेप
राजस्तानच्या क्रीडा मंत्र्यांनी सवाई मानसिंग स्टेडिअम (Sawai Mansingh Stadium) येथे आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने बनवलेल्या बांधकामांबाबत आक्षेप घेतला होता. राजस्थान रॉयल्सबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी स्टेडिअममध्ये बनवलेल्या सीटिंग बॉक्स आणि छतावर जाणाऱ्या रस्त्यांवर टाळे लावले होते. त्यांच्या मते, स्थायी आणि अस्थायी बांधकाम अतिक्रमणाच्या यादीत येतात आणि यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
राज्य क्रीडा परिषदेच्या अध्यक्षांकडून सूचना
यादरम्यान राज्य क्रीडा परिषदेचे अध्यक्षा कृष्णा पूनिया यांनी दुपारी भाष्य केले की, क्रीडा मंत्र्यांनी परिषदेच्या कामकाजामध्ये आले नाही पाहिजे. सायंकाळी त्यांनी असे म्हटले की, त्या यापुढे कोणतेही वादग्रस्त विधान करणार नाहीत. याखेरीज आयपीएलच्या 26व्या सामन्यातून राजस्थान रॉयल्स आणि क्रीडा विभागातील प्रकरणानंतर सायंकाळी रॉयल्स संघ व्यवस्थापन क्रीडा मंत्र्यांकडे जाऊन दंड भरण्यासाठी तयार झाले. (jaipur ipl 2023 team rajasthan royals bowed down to sports ministers insistence ready to pay fine read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवाने पूर्ण खचला कर्णधार संजू सॅमसन; म्हणाला, ‘जास्त प्रयत्न केला अन् विकेट्स…’
गुड न्यूज! ‘हा’ महान फलंदाज 47व्या वर्षी दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, पत्नीच्या पोटी राजकुमारीचा जन्म