---Advertisement---

देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 2:45 PM
Gehlot
---Advertisement---

राजस्थान क्रिकेट संघटनाच्या (Rajasthan Cricket Association, आरसीए)) निवडणुकीला सुरूवात होणार आहे. क्रिकेटच्या राजकारणातील ही महत्वाची निवडणूक ठरणार आहे. सध्या आरसीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत आहे. वैभवने निवडलेली कार्यकारी समिती नेमण्यात आली आहे. यामुळे दुसऱ्यांदा वैभव निवडणूकाच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्या कार्यकारी समितीच्या काही सदस्यांना निवडणूक लढण्यासाठी लोढा समितीचे काही नियम मार्गात अडथळे बनवतील. यामुळे ते निवडणूक लढवतील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. का आरसीएला नवीन अध्यक्ष आणि नवी कार्यकारी समिती मिळणार हे उत्सुकतेचे ठरणार आहेत.

सध्या कार्यन्वित असलेल्या समितीचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला पूर्ण होणार आहे. तीन वर्षापूर्वी ४ ऑक्टोबर, २०१९मध्ये वैभव गेहलोत यांना आरसीएचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी रामेश्वर डूडी संघाला निवडणूकीत पराभूत केले होते. ती निवडणूक जिंकल्यावर ते म्हणाले, “क्रिकेटच्या चांगल्यासाठी काम करणार आहे. आरसीएचे माजी अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.”

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या निवडणूकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अध्यक्ष म्हणून वैभव यांची दावेदारी निश्चित आहे. सध्याच्या कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष अमीन पठान, सचिव महेन्द्र शर्मा, कोषाध्यक्ष कृष्ण निमावत, संयुक्त सचिव महेंद्र नाहर आणि कार्यकारिणी सदस्य देवाराम चौधरी हे आहेत. यातील बहुतेक जणांवर पुन्हा निवडणूक लढण्याची अनिश्चितता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूकीसाठी लोढा समितीचे काही नियम लागू केले आहेत.

लोढा समितीच्या नियमानुसार, राज्य क्रिकेट संघ किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांमधील अधिकाऱ्यांना सहा वर्षाच्या कार्यकाळानंतर तीन वर्षाच्या ब्रेकवर जावे लागेल. या नियमाच्या अंतर्गत राज्य संघातील काही अधिकारीही येत आहेत. त्यांनाही ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने तो ब्रेक टाईम संपवण्याची मागणी केली होती, जेणेकरून सध्या कार्यन्वित असलेल्या अधिकाऱ्यांना सहा वर्षानंतरही पदावर राहण्याची संधी मिळेल. न्यायालयाच्या याच निर्णयावर आता आरसीएचे लक्ष आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

lpl: चेन्नईच्या स्टार गोलंदाजाने घेतलाय भन्नाट कॅच, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल दंग

पाकिस्तानची स्पीडगन पडली भारी! फलंदाजाच्या उडवल्या दांड्या, भन्नाट व्हिडिओ होतोयं व्हायरल

केएल राहुल पुनरागमनासाठी पुर्णपणे फिट! स्वत: फोटो पोस्ट करत सांगितली खास गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---