---Advertisement---

रोहित शर्माने डाव घोषित करण्यापूर्वीच जैस्वाल आणि सरफराज फिरले माघारी, अन् मग झालं असं काही, पाहा व्हिडिओ

On: रविवार, फेब्रुवारी 18, 2024 3:02 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. सामन्यावर भारताने पकड मजबूत केली असून टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 430 धावा ठोकत इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे आव्हान ठेवले आहे. पण भारतीय डाव सुरू असताना एक विचित्र प्रकार घडला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

याबरोबरच, भारताकडून यशस्वी जैस्वालने दमदार 214 धावांची द्विशतकी खेळी केली. तर शुभमन गिल 91 धावा करून धावबाद झाला. तर सर्फराज खानने पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या डावात देखील अर्धशतक ठकले. त्याने नाबाद 68 धावा केल्या आहेत. पण रोहित शर्माने डाव घोषित करण्यापूर्वी जैस्वाल आणि सरफराजला माघीरी फिरले होते. कारण त्याना समजले की कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला आहे.

दरम्यान, यशस्वीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं दुसरं द्वशतक ठोकलं. यशस्वीने 236 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा केल्या. तर यशस्वीला उत्तम साथ देत सरफराज खान याने 72 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. त्याआधी शुबमन गिल याने 91 आणि सरफराज खान याने 27 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 19 धावा जोडल्या. रजत पाटीदार याला भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडकडून जो रुट, टॉम हार्टली आणि रेहान अहमद या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---