आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने या सामन्यात अक्षरशः वादळ आणले. जयस्वालने अवघ्या 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम दिग्गज केएल राहुल याच्या नावावर होता. राहुलने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक केले होते.
आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विचार केला, तर यापूर्वी हा विक्रम केएल राहुल (KL Rahul) आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्या नावावर होता. राहुल आणि कमिन्सने प्रत्येकी 14-14 सामन्यांमध्ये ही कामगिरी नावावर केली होती. पण गुरुवारी (11 मे) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने विक्रम मोडला. अवघ्या 13 चेंडूत जयस्वालने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावांचा टप्पा पार केला.
आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज
यशस्वी जयस्वाल – 13 चेंडू
केएल राहुल – 14 चेंडू
पॅट कमिन्स – 14 चेंडू
युसूफ पठाण – 15 चेंडू
सुनील नरेन – 15 चेंडू
निकोलस पुरन – 15 चेंडू
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर राजस्थानला विजयासाठी केकेआरकडून 150 धावांचे आव्हान मिळाले होते. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 8 बाद 149 धावा केल्या. केकेआरसाठी वरच्या फळीतील वेंकटेश अय्यर याने 42 चेंडूत 57 धावा कुटल्या. पण प्रत्युत्तरात यशस्वी जयस्वाल () याने आयपीएल इतिहासातील सर्व विक्रम मोडले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षात जयस्वालने हा विक्रम नावावर केला. (JAISWAL SMASHED FIFTY FROM JUST 13 BALLS.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू
ब्रेकिंग! चहलने रचला इतिहास, ब्रावोच्या विक्रमाला धक्का देत बनला IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर