सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम जोमात सुरू आहे. या स्पर्धेत अनेक विक्रमांचे मनोरे रचले जात आहेत. तसेच, प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी दूरवरून स्टेडिअममध्ये हजेरी लावत आहेत. अशात बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023च्या 55व्या सामन्यात आमने-सामने होते. हा सामना चेन्नईने 27 धावांनी जिंकला. असे असले, तरीही सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (दि. 9 मे) एमएस धोनीने ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ टीमची भेट घेतली.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या डॉक्यूमेंट्री सिनेमाने 95व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार (Oscars Award) जिंकला होता. मंगळवारी एका खास कार्यक्रमादरम्यान खऱ्या आयुष्यात हत्तींचा सांभाळ करणाऱ्या बोमन आणि बेली (Bomman and Bellie) यांनी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत या डॉक्टूमेंट्रीच्या निर्मात्या कार्तिकी गोन्साल्विस (Kartiki Gonsalves) यादेखील उपस्थित होत्या.
चेन्नई सुपर किंग्सने केले सन्मानित
सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान हत्तींचा सांभाळ करणाऱ्या बोमन आणि बेली यांना सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त द एलिफंट व्हिस्परर्स सिनेमा बनवणाऱ्या निर्मात्या कार्तिकीदेखील ऑस्कर्ससह उपस्थित होत्या. सर्वांना चेन्नईने सात नंबरची जर्सी भेट म्हणून दिली. यावर त्यांच्या सर्वांची नावे लिहिली होती.
बोमन आणि बेली यांच्या आयुष्यावर आधारित आहे सिनेमा
सीएसकेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यादरम्यानचे फोटो पोस्ट केले. डॉक्यूमेंट्रीविषयी बोलायचं झालं, तर रघू नावाचा एक व्यक्त एका हत्तीचा सांभाळ करतो. तो शिकाऱ्यांपासून हत्तीला वाचवण्यासाठी आणि त्याला पाळण्यासाठी आपले जीवन समप्रित करतो. ही कहाणी बोमन आणि बेली नावाच्या जोडप्याकडून प्रेरित आहे. ही डॉक्यूमेंट्री कार्तिकी गोन्साल्विस यांनी दिग्दर्शित केलेला पहिला डॉक्यू सिनेमा होता.
चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्लीविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत दुसरा स्थान पटकावला. चेन्नईचे 12 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवांसह 15 गुण मिळवत दुसरे स्थान मजबूत केले. चेन्नईचा पुढील सामना 14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. (ipl 2023 skipper ms dhoni meets oscar winning the elephant whisperers team bomman bellie and kartiki gonsalves)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यांनी मला फोन करून…’, खराब फॉर्ममध्ये असताना टीका करणाऱ्यांबद्दल नितीश राणाचा धक्कादायक खुलासा
Toss: प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी कोलकाता अन् राजस्थान आमने-सामने, ‘या’ जबरदस्त गोलंदाजाचे कमबॅक