क्रिकेटपटू चांगल्या स्तरावर पोहचून संपत्ती आणि कीर्ती दोन्ही मिळवू शकतात. परंतु या वेळी त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्यासाठी खूप दबाव असतो आणि म्हणूनच त्यांना बर्याच मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. अलीकडेच ऑस्ट्रेलियामधील अनेक क्रिकेटपटूंनी नैराश्यामुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. ज्यात आणखी एका युवा खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा 25 वर्षीय फलंदाज जॅक वेदरल्ड.
वेदरल्डने मानसिक त्रासांमुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे. वेदरल्ड ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी स्पर्धेत शेफ्लिड शिल्डमध्ये खेळत होता. त्याने शतकी खेळी करुन स्पर्धेत पदार्पण केले होते. पण आता अचानक त्याने मध्यभागी येऊन खेळ सोडला आहे.
वेदरल्डने शेफील्ड शील्ड का सोडली?
क्रिकेटमधील मानसिक दबावामुळे जेक वेदरल्डने ब्रेक घेतला की वैयक्तिक समस्यांमुळे या खेळाडूने हे पाऊल उचलले हे अद्याप पुर्णतः उघड झालेले नाही. स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मेडिसिनचे व्यवस्थापक म्हणाले, ‘आम्ही वेदरल्डच्या निर्णयाचा आदर करतो, ज्याने स्पर्धा सोडण्याचा कठीण आणि योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही त्याच्या निर्णयाच्या सोबत आहोत आणि त्याबाबत त्याच्या संपर्कात राहू. जेव्हा जेव्हा तो निवडीसाठी तयार असेल, आम्ही त्याच्याशी बोलू.
जेक वेदरल्डच्या जागी विल बॉसिस्टोचा आता संघात समावेश करण्यात आला आहे, तर वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरेल देखील दुखापतीतून सावरला आहे आणि 30 ऑक्टोबरला व्हिक्टोरियाविरुद्ध खेळू शकतो. जेक वेदरल्डच्याआधी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि विल पुकोव्हस्की यांनीही मानसिक दबावामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
जेक वेदरल्डने आत्तापर्यंत प्रथम श्रेणीमध्ये 46 सामने खेळताना 2972 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटपमध्ये 25 सामन्यात 997 धावा केल्या आहेत. तर 48 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात 1235 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणी, अ दर्जा आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मिळून 12 शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या मिस्ट्री स्पिनरने केले आहे ‘या’ चित्रपटात काम
सुर्यकुमार यादव दुसऱ्या देशाकडून खेळणार? ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या ट्वीटनंतर चर्चेला उधाण
IPL 2020: १६ गुण मिळवूनही प्ले ऑफमध्ये मिळणार नाही संधी?, पाहा काय आहे समीकरण