भारतीय क्रिकेट वर्तुळात मागील अनेक दिवसांपासून वरुण चर्क्रवर्ती या फिरकीपटूची चर्चा आहे. त्याची मागीलवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी, तसेच यावर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्याला तंदुरुस्तीमुळे या मालिकांमध्ये खेळता आले नाही. अखेर, त्याला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली आणि त्याने भारताकडून पदार्पण केले. आज(२९ ऑगस्ट) त्याचा ३० वा वाढदिवस आहे. त्याच्याबाबतीत एक खास गोष्ट म्हणजे त्याने एका चित्रपटातही काम केले आहे.
वरुण चक्रवर्तीचा क्रिकेट प्रवास खूपच रंजक ठरला आहे. शालेय काळात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण नंतर तो मध्यमगती गोलंदाज झाला. यानंतर आणखी एक वळण आले की त्याने क्रिकेट सोडले आणि तो एक व्यावसायिक आर्किटेक्ट म्हणून पुढे जाऊ लागला. परंतु त्याचं मन नोकरीत न लागल्याने तो पुन्हा क्रिकेटकडे वळाला.
त्याकाळात त्याने दाक्षिणात्य चित्रपटातही भूमिका केली होती. त्यांने ‘जीवा’ या तमिळ चित्रपटात एक कॅमिओ केला. त्या चित्रपटात तो चित्रपटाचा नायक ‘जीवा’ याच्याबरोबर क्रिकेट क्लबसाठी सामना खेळतो. जीवा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. राजकारण तसेच कठोर परिश्रम करूनही एखाद्या व्यक्तीला भारतीय संघात कशी संधी मिळत नाही, हे त्या चित्रपटात दाखवण्यात आले होते.
क्रिकेटमधील कामगिरी
वरुणने आतापर्यंत क्रिकेटमध्ये १ प्रथम श्रेणी सामना, ९ अ दर्जाचे सामने आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १ विकेट घेतली आहे. यासोबतच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने १६.६८ च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२० मध्ये त्याने २४.८५ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून त्याला २ विकेट्स घेण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या कसोटीसाठी ‘हा’ खेळाडू करू शकतो टीम इंडियात पुनरागमन, कोहलीचे संघबदलाचे संकेत
तब्बल ‘एवढ्या’ कोटी रुपयांचे नुकसान पत्करून रोनाल्डो खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी
‘तू महान खेळाडू झालास’, ज्याचा विक्रम मागे टाकला त्यानेच रुटचा लहानपणीचा फोटो केला शेअर