इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं त्याच्या सर्वकालीन इलेव्हनची घोषणा केली आहे. त्याच्या संघात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हा संघ अशा 11 खेळाडूंचा आहे, ज्यांनी खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे, परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे, यात एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. जेम्स अँडरसनची सर्वकालीन प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे –
ॲलिस्टर कूक (इंग्लंड) : सलामीवीर म्हणून अँडरसननं त्याचा दीर्घकालीन साथीदार आणि इंग्लंडच्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक असलेल्या ॲलिस्टर कूकची निवड केली.
वीरेंद्र सेहवाग (भारत) : अँडरसननं या लिस्टमध्ये आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा समावेश केला आहे. सेहवाग त्याच्या स्ट्राइक रेट साठी ओळखला जातो.
विराट कोहली (भारत) : विराट कोहली मॉडर्न डे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये आपला धाक जमवला आहे.
जो रूट (इंग्लंड) : जो रूटचा मधल्या फळीतील विश्वसनीय फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो सध्या जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक आहे.
सचिन तेंडुलकर (भारत) : क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरला देखील अँडरसनच्या या लिस्टमध्ये जागा मिळाली आहे.
अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) : या संघात फ्लिंटॉफचा समावेश अष्टपैलू खेळाडू म्हणून करण्यात आला आहे. त्यानं इंग्लंडसाठी बॉल आणि बॅट दोन्हीने प्रभावी कामगिरी केली आहे.
रिषभ पंत (भारत) : अँडरसननं या संघात पंतची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. पंतचा आक्रमक खेळ आणि उत्कृष्ट किपिंग कौशल्य त्याला संघाचा महत्त्वाचा भाग बनवतं.
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : महान लेगस्पिनर शेन वॉर्नला या संघात फिरकी गोलंदाज म्हणून स्थान मिळालं आहे. वॉर्नच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा अधिक बळी आहेत.
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : वेगवान गोलंदाजीत अँडरसननं त्याचा जोडीदार ब्रॉडची निवड केली. त्यानं कसोटीत 600 हून अधिक बळी घेतले आहेत.
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) : ग्लेन मॅकग्रा हा त्याच्या अचूक लाईन आणि लेन्थसाठी ओळखला जातो. तो या संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे.
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) : स्विंगचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेल स्टेनच्या नावे कसोटी रँकिंगमध्ये सर्वाधिक काळ पहिल्या स्थानावर राहण्याचा विश्वविक्रम आहे.
हेही वाचा –
स्टेडियममध्ये प्रपोज करून किस केलं, लाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचा रोमान्स व्हायरल; VIDEO पाहा
“त्यांच्याशी हसून बोलू नको”, स्टंप माइकवर कोहलीचा सिराजला सल्ला, VIDEO व्हायरल
4,4,4,4,4,4….मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने ओव्हरमध्ये ठोकले सलग 6 चौकार!