---Advertisement---

बुड्ढे में है दम! अँडरसनने वयाच्या चाळीसीत मोडला ११० वर्ष जूना विक्रम, नावे केला वर्ल्ड रेकॉर्ड

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 1:22 PM
James-Anderson
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अंडरसनने एक नवा विक्रम रचला आहे. जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेट घेताच मोठा विक्रम आपल्या नावे केला. त्याने ११०वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला आहे. वयाच्या ४०व्या वर्षी कसोटी विकेट घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी बार्न्सला मागे टाकले.

ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज सिडनी बार्न्सने १९१२ मध्ये वयाच्या ३९ वर्षे ५२ दिवसाच्या वयात कसोटी विकेट घेतली होती, मात्र जेम्स अँडरसनने ४० वर्षे १९ या दिवस वयात कसोटी विकेट घेऊन इतिहास रचला होता. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये एका दिवसात २०-२५ षटके टाकण्यासाठी अँडरसन अजूनही तंदुरुस्त आहे. शिवाय त्याच्या गोलंदाजीने आजही कसोटी क्रिकेटवर वर्चस्व राखून ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने १८ षटकांत ५१ धावांत १ बळी घेतला. त्याने कर्णधार डीन एल्गरला वैयक्तिक ४७ धावांवर बाद केले. यासह त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५८ विकेट्स आहेत. तो सध्याचा जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज देखील आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिल्या डावात ७ विकेट गमावून २८९ धावा केल्या.

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा रंगना हेराथ यांनी वयाच्या ४० पेक्षा जास्त वयात कसोटी विकेट घेण्याचा पराक्रम केला होता, परंतु हे दोघेही फिरकीपटू होते. मात्र, आता अंडरसनने हा विक्रम देखील मोडीत काढत सर्वात जास्त वयात गोलंदाजी करताना विकेट घेण्याच्या यादीत आपले नाव शिखरावर कोरले आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘अशी आशिया चषकाचा तयारी होणार का?’ सामना जिंकल्यानंतरही राहुलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

‘धोनी विराट अन् रोहितला लाभलं नाही ते भाग्य दीपक हुड्डाच्या नशीबी!’ ठरतोय इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर

भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे बोर्डाची चांदी, ३ वनडे सामन्यांतून कमावणार ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---