लंडन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व बंद पडले आहे. त्यामुळे खेळाडू मैदानापासून दूर आहेत. अधिकतर खेळाडूंना पुनरागमन करता येईल का याची चिंता आहे.
त्यातच इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या कारकीर्दीला थोडा फायदा होणार आहे. अँडरसन म्हणाला, कोरोना व्हायरसमुळे खेळाला थोडा ब्रेक मिळाला आहे.
कोविड-19मुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटसह सर्व खेळाचं आयोजन रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहे. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या अँडरसनने सांगितले, यामुळे त्याला आरामासाठी वेळ मिळाला आहे. तसेच त्यामुळे कारकीर्दही पुढे वाढू शकते.
इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा 37 वर्षांच्या या गोलंदाजाने बीबीसी पॉडकास्टमध्ये सांगितले, “यामुळे माझी कारकीर्द एक ते दोन वर्षांनी वाढू शकते.”
अँडरसनने दुखापतग्रस्त होण्याअगोदर जानेवारीमध्ये शेवटचा सामना खेळला होता. तसेच तो त्या पंधरा खेळाडूंमध्येही आहे, जे ईसीबीने (England Cricket Board) वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव करण्यासाठी बोलावले आले आहे.
तो म्हणाला, “मला पुनरागमन करून नेटमध्ये गोलंदाजी करताना चांगलं वाटत आहे. सरावादरम्यान आमच्या जवळ-पास जास्त लोकं नसतात. पण क्रिकेटसाठी पुनरागमन करणं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कोरोनानंतर ईसीबीने 8 जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचे सुरक्षित ठिकाणी आयोजन केले आहे.”
“यानंतर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, आणि आयर्लंड विरुद्ध वनडे मालिकाही आहे. तुम्ही खेळाडू म्हणून 8 जुलैला पुनरागमन करण्याची वाट बघत आहात. परंतु यासाठी सरकार आणि ईसीबीकडून सर्व काही ठीक होणं गरजेचं आहे,” असेही अँडरसन पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ब्रेकिंग: इंग्लंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा
-मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल
-वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात ज्यो रुट होवू शकतो संघाबाहेर, कारण…