---Advertisement---

कोरोना इफेक्ट: क्रिकेटमध्ये विकेट घेतली रे घेतली की असं करायचं सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जुलै 3, 2020 3:22 PM
---Advertisement---

मुंबई । गोलंदाजाने ‘विकेट’ घेतल्यानंतर त्याचे सहकारी खेळाडू हस्तांदोलन किंवा एकमेकाला टाळी देऊन आनंद साजरा करतात. पण आता क्रिकेटमध्ये असे होणार नाही. एकमेकांना टाळी देणे किंवा हस्तांदोलन करण्यावर कोणतेच निर्बंध घातले नाहीत, मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेळाडूंनी हस्तांदोलन अथवा टाळी देणे बंद केले आहे. याची सुरुवात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने केली आहे.

८ जूलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडचा संघ आपल्या खेळाडूंमध्येच सराव सामना खेळत आहे. या सामन्यात जेम्स अँडरसनने आपल्या हाताच्या कोपराने दुसऱ्या खेळाडूंच्या हाताच्या कोपऱ्याला स्पर्श करत विकेट घेतल्याचा आनंद व्यक्त केला. म्हणजेच आता खेळाडू विकेट घेतल्याचा आनंद केवळ स्माइल आणि एल्बो कॉन्टॅक्टच्या माध्यमातून करत आहेत.

इंग्लंड संघातील खेळाडूंनी ‘इंटीग्रल’ सराव सामना खेळला. ज्यामध्ये बेन स्टोक्स एका संघाचा कर्णधार तर जोस बटलर हा दुसऱ्या संघाचा कर्णधार होता. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जेम्स अँडरसनने या सामन्यात दोन बळी टिपले. विकेट घेतल्यानंतर एल्बो कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त करतानाचे फोटो आणि व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

या व्हिडीओत जेम्स अँडरसन जो डेनली आणि यष्टिरक्षक बेन फोक्स हाताच्या कोपरा एकमेकांना स्पर्श करून आनंद व्यक्त करत आहेत. मैदानाच्या सीमेरेषेजवळ सॅनिटायझर देखील ठेवण्यात आले आहेत. सामन्यात वेळोवेळी खेळाडूंना या सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

आयपीएल नाही झाली म्हणून काय झालं, ऑगस्टमध्ये होणार ही मोठी प्रीमीयर लीग

वानखेडेवर झालेल्या पराभवामुळे संगकाराची झाली तब्बल ५ तास चौकशी, नाराज संगकारा…

सासऱ्यांच्या अंत्यविधीला गेलेल्या क्रिकेट कोचच्या नोकरीवर येणार गदा? पहा काय झाला निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---