इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका सध्या खेळली जात आहे. यजमान इंग्लंड संघ 1-2 अशा अंतराने मागे आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (27 जुलै) सुरू होणार आहे. इंग्लंडाच दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अद्याप या मालिकेत आफल्या गोलंदाजीची जादू दाखवू शकला नाहीये. दरम्यान अँडरसनच्या निवृत्तीबाबत देखील चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. पण अँडरससने नुकतेच स्वष्ट केले की, निवृत्तीबाबत त्याने अद्याप विचार केला नाहीये.
जेम्स अँडरसन (James Anderson) ऍशेस 2023 (Ashes 2023) मधील पहिल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये खेळला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. सुमार प्रदर्शनामुळे त्याला संघातून बाहेर बसवल्याचे बोलले जात आहे. उभय संघांतील पाचवा कसोटी सामना द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिकेतील या शेवटच्या कसोटीनंतर अँडरसन निवृत्त होणार, असे सांगितले जात आहे. पण या चर्चाबाबत आता स्वतः अँडरसनने स्पष्टीकरण दिले.
द टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये अँडरसन म्हणतो की, “युयवा पीढी आजूबाजूला असण्याचा मी आनंद घेत आहे. मला या मालिकेत अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही, जशी इच्छा होती. पण प्रत्येकजण कठीण काळातून जात असतो. पण सर्वात महत्वाच्या मालिकेत असे व्हावे, असे कुणालाच वाटत नाही. 10-15 वर्षांपूर्वीही मला संघातून बाहेर करण्यासाठी अशाच प्रकारे वाद व्हायचा.”
अँडरसनने पुढे निवृत्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “मला कसोटी क्रिकेट खेळायला आजही तितकेच आवडते. जितके आधी आवडायचे. इंग्लंड संघाचा क्रिकेटपटू म्हणून हा माझा आवडता काळ आहे. निवृत्ती घेण्याचा अद्याप कुठला विचार केला नाहीये.” दरम्यान, अँडरसन सध्या 40 वर्षांचा असून येत्या काही दिवसांमध्ये तो 41 वर्ष पूर्ण केरल. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 669 विकेट्स घेतल्या आहेत. यासाठी त्याला 182 कसोटी सामने खेळावे लागले आहेत. ऍशेस 2023मध्ये त्याने तीन सामन्यात अवघ्या 4 विकेट्स घेतल्या आहेत. ही मालिका सुरू होण्याआधीतो दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. पुनरागमनानंतर त्याच्या गती कमी झाली आहे आणि चेंडूचा स्विंग देखील आधीप्रमाणे नाही, असे बोलले जात आहे. (James Anderson has clarified his stance on retirement)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या सौद शकीलने घडवला इतिहास! कसोटी कारकिर्दीत कुठल्याच खेळाडूला जमली नाही ‘अशी’ सुरुवात
शेवटच्या ऍशेस सामन्यासाठी असे आहे इंग्लिश स्कॉड, दिग्गज खेळाडूच्या निवृत्तीची शक्यता