2025च्या आयपीएल (India Premier League) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. पण आगामी आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी बीसीसीआये दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेन्शन यादी जाहीर केली. यंदाच्या मेगा लिलावात इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आयपीएल लिलावात उतरला आहे. त्याने त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे. पण यंदाच्या लिलावात खेळाडूंची संख्या 1,574 आहे, त्यामुळे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, अँडरसनला कोणता संघ बोली लावले का?
आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग, जो वयाच्या 45व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळला होता. आता या वयस्कर खेळाडूंच्या यादीत जेम्स अँडरसनचे (James Anderson) नावही जोडले जाऊ शकते. वास्तविक, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे जेम्स अँडरसन मेगा लिलावात न विकला जाऊ शकतो.
मेगा लिलावात जेम्स अँडरसनवर बोली न लागण्याचे पहिले कारण हे असू शकते की, गेल्या 10 वर्षांत त्याने एकही टी20 सामना खेळला नाही. 2014 मध्ये तो इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून टी20 सामना खेळला होता. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळून 15 वर्षांहून अधिक काळ गेला आहे. त्याने आपल्या टी20 कारकिर्दीत 44 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 41 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
अँडरसनने गेल्या 10 वर्षांपासून एकही टी20 सामना खेळला नाही आणि 2015 नंतर एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. त्यामुळे अँडरसनच्या हातात पांढरा चेंडू येऊनही बराच काळ झाला आहे. अशा स्थितीत अँडरसन 10 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर कशी कामगिरी करू शकेल, याबाबतही फ्रेंचायझीच्या मनात प्रश्न असेल. त्याची मूळ किंमत देखील 1.25 कोटी रुपये आहे, जी खूप जास्त दिसते.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतीय कोचिंग स्टाफमध्ये अभिषेक नायरची भूमिका काय?” माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
BGT 2024-25; रोहित शर्माची जागा घेणार केएल राहुल?
टी20 वर्ल्डकप गाजवणारा महाराष्ट्राचा पठ्ठा आता आयपीएलमध्ये खेळणार!