आंतरराष्ट्रीय क्रिकेट सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झुगारून पूर्वपदावर येत आहे. अनेक संघांचे वेगवेगळे दौरे सुरू आहेत.आगामी काळात इंग्लंडचा श्रीलंका दौरा होणार असून, इंग्लंड संघ या दौर्यात 2 कसोटी सामने खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची प्रतिक्रिया आली असून, तो या दौऱ्यासाठी विशेष उत्सुक आहे.
एका इंटरव्यू दरम्यान जेम्स अँडरसनने मागील श्रीलंका दौऱ्यातील अनुभव व आगामी काळात असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या आहेत. अँडरसन म्हणाला की,मागील काही काळापासून श्रीलंका मधील खेळपट्ट्या या फिरकीपटूंसाठी उपयुक्त राहिलेल्या आहेत. मात्र येथे वेगवान गोलंदाजांना देखील बळी मिळवण्यात यश मिळत आहे. श्रीलंकेत नवीन चेंडूने स्विंग तसेच जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग देखील मिळते.
जेम्स अँडरसन पुढे म्हणाला की, मला गॉलमध्ये खेळताना यश मिळालेले आहे. केवळ मलाच नाही तर इतर वेगवान गोलंदाजांना देखील गॉल येथे मदत मिळत असून ,श्रीलंका दौऱ्यात वेगवान गोलंदाजांनी निराश होण्याचे काहीही कारण नाही.
इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 14 जानेवारीपासून गॉल येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. इंग्लंड संघ श्रीलंकेत पोहोचला असून त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. या कोरोना चाचणीमध्ये इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना आशा आहे की आगामी काळात खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग न होता, मालिका उत्तमपणे पार पडेल.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका
SA vs SL : सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, मी स्टीव्ह स्मिथला कोचिंग करत नाही, कारण..






