सध्या इंग्लंचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहेे. इंग्लंड संघ तब्बल 17 वर्षांनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला. इंग्लंड आणि पाकिस्तान संघात 3 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, या दौऱ्यावर असा एक खेळाडू आहेे, जो 17 वर्षांआधी देखील कसोटी सामना खेळण्यासाठी आला होता आणि आता तब्बल 17 वर्षांनंतर देखील तो संघाच महत्वाचा भाग आहे. तो खेळाडू म्हणजे जेम्स एँडरसन. 17 वर्षांनंतर पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या एँडरसनने यावर प्रतिक्रिया दिली.
2009मध्ये पाकिस्तानमध्येे श्रीलंका संघावर आतंकवादी हल्ला झाला होता. त्यानंतर जगातील सर्वच देशांनी पाकिस्तान दौरा टाळला होता. मात्र, मध्यंतरी बऱ्याच संघानी पाकिस्तानचा दौरा यशस्वीरीत्या पार पाडला. आता इंग्लंडचा कसोटी संघ 17 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. 17 वर्षाआधी केलेल्या दौऱ्यात इंग्लंड संघाचा भाग असणाऱ्या आणि आताही इंग्लंड संघाचा भाग असणाऱ्या जेम्स एँडरसन (James Anderson) याने आपली प्रतिक्रिया दिली. एंडरसन म्हणाला की, “मी नशीबवान आहे, कारण मी अजुनही फिट आहेे. मी खुप नशीबवान आहे, कारण मी अजुनही संघाचा भाग आहे. मी खरचं खूप नशीबवान आहे, कारण इतक्या वर्षांनंतर मला पुन्हा संधी मिळाली.” या दौऱ्यावर खेळायची संधी मिळाल्याने एँडरसन आनंदी आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी कर्णधार इमरान खान (Imran Khan) यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला. त्यामुळे या दौऱ्यासाठी आधी इंग्लंड संघाने नकार दिला होता. मात्र, सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतर इंग्लंडचा संघ दौर्यावर येण्यासाठी तयार झाला. या दौऱ्यावर इंग्लंडचे प्रतिनिधित्व बेन स्टोक्स करणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्ता संघात एकूण 3 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे 1 ते 5 डिंसेबर दरम्यान खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना मुलतान (9-13 डिसेंबर) तर तिसरा कसोटी सामना कराची येथे 17 ते 21 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान संघामध्ये खेळवली जाणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.(James Anderson is feeling happy for playing in pakistan after 17 years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांचे न्यूझीलंडसमोर ‘घालीन लोटांगण’! सुंदरच्या झुंजार अर्धशतकानंतरही टीम इंडिया 219 वर ऑल आऊट
पंतच्या उलट्या बोंबा! सतत फ्लॉप ठरल्यानंतर म्हणतोय, “माझी तुलना करू नका”