---Advertisement---

है घर, है पैसा, है गाड़ी…,जेम्स अँडरसनची नेट वर्थ हनी सिंगच्या या गाण्याला साजेशी, जाणून घ्या एकूण संपत्ती

On: शनिवार, जुलै 13, 2024 2:03 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात 42 वर्षांच्या जेम्स अँडरसनने क्रिकेट जगताचा निरोप घेतला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना जेम्स अँडरसनचा 188वा आणि शेवटचा कसोटी सामना होता. अँडरसनने आपल्या कर्तृत्वाने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 704 विकेट घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो वेगवान गोलंदाज आहे.

एवढेच नाही तर जेम्स अँडरसन कमाईच्या बाबतीतही कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा कमी नाही. त्याच्याकडे करोडोंची संपत्ती, आलिशान घरे आणि दमदार गाड्या आहेत. अँडरसनला लक्झरी कारचा शौक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे एक आलिशान घरही आहे.

वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची संपत्ती करोडो रुपयांमध्ये आहे. ताज्या माहितीनुसार अँडरसनची एकूण संपत्ती 160 कोटी रुपये आहे. त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून दर वर्षी 80 कोटी रुपये इतका पगार मिळतो. याशिवाय तो अनेक कंपन्यांच्या जाहिराती देखील करतो. ज्यमध्ये त्याच्या संपत्ती मध्ये अतिरिक्त वाढ होते. 

जेम्स अँडरसनचे जिवन ही तेवढेच शानदार आहे जेवढी त्याची वेगवान गोलंदाजी आहे. त्याच्या कडे चेशायर शहरात शानदार अलीशान घर आहे. याशिवाय त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एम3 (BMW M3) आणि ऑडी आर6 (Audi R6) सारख्या दमदार गाड्या आहेत.

जेम्स अँडरसनने कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणार पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने 188 कसोटी सामन्यात 704 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.92 च्या इकॉनॉमीने 269 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7.84 च्या इकॉनॉमीने 18 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्तवाच्या बातम्या-

5 स्टार भारतीय खेळाडू, जे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतात
अनंत अंबानींच्या लग्नात गंभीरचा ‘किलर’ लूक, नव्या हेड कोचची ‘झलकं’ पाहून तुम्ही व्हाल घायाळ…
“माझा यावर अजिबात विश्वास नाही…”, गौतमने हार्दिकसह सर्व खेळाडूंना दिला ‘गंभीर संदेश’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---