---Advertisement---

इंग्लंडला मोठा धक्का; अँडरसन कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

On: गुरूवार, जानेवारी 9, 2020 6:53 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिल्या 2 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा कसोटी सामना 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

परंतू त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बरगड्यांच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

त्याला केपटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्रास होत होता. त्यामुळे त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. या स्कॅनमधून स्पष्ट झाले आहे की तो पुढे उर्वरित कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही.

विशेष म्हणजे त्याने इंग्लंड संघात अनेक महिन्यांनतर पुनरागमन केल्यावर केवळ 2 सामने खेळले आहेत. तो मागीलवर्षी पार पडलेल्या ऍशेस मालिकेपासून पोटरीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या अनेक सामन्यांना मुकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---