---Advertisement---

700 टेस्ट विकेट्स घेणारा दिग्गज पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात, मुळ किंमत जाणून व्हाल थक्क!

---Advertisement---

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात स्वतःची नोंदणी केली. 42 वर्षीय अँडरसन त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामाकडे पाहत आहे. याआधी तो एकदाही आयपीएल खेळला नाहीये. अँडरसन जगातील कोणत्याही टी20 लीगचा भाग नाही.

आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या क्वालिटी ब्लास्ट लीगमध्ये भाग घेतला आहे. आता अँडरसनला इंग्लंडबाहेर टी20 क्रिकेट लीग खेळण्यात रस आहे. रिपोर्ट्सनुसार, अँडरसनने आयपीएलसाठी त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत अँडरसनवर कोणता संघ बोली लावतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जेम्स अँडरसनने 10 वर्षांपूर्वी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्याने 2014 मध्ये व्हॅली ब्लास्टमध्ये शेवटचा भाग घेतला होता. अशा स्थितीत 42 वर्षीय वेगवान गोलंदाजाला कोण विकत घेणार हा प्रश्न अधिक मनोरंजक आहे. ज्याने 10 वर्षांपूर्वी शेवटचा टी20 सामना खेळला होता. अश्या स्थितीत या प्रश्नाचे उत्तर लिलावातच मिळेल.

 

अँडरसन गेली अनेक वर्षे इंग्लंडकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता. जुलै 2024 मध्ये लॉर्ड्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अँडरसनकडे इंग्लंड कॅम्पमध्ये मेंटॉर म्हणून पाहिले जात होते.

अँडरसनने आपल्या T20 कारकिर्दीत आतापर्यंत 44 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 44 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 32.14 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/23 होती. या दरम्यान अँडरसनने 8.47 च्या इकॉनॉमीवर धावा दिल्या. याशिवाय त्याने 10 डावात फलंदाजी करताना 23 धावा केल्या.

हेही वाचा-

आयपीएल मेगा लिलावात 409 परदेशी खेळाडू सहभागी, या 2 देशांतील सर्वाधिक!
IPL 2025 Mega Auction: या भारतीय खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये, पाहा संपूर्ण यादी
IPL; मेगा लिलावात भारतातील 1165 खेळाडूंची नोंदी; कॅप्ड खेळाडूंची संख्या जाणून व्हाल थक्क!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---